पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. वेदांसाठी व वेदामधून गणित, स्थापत्य, वैद्यक, युद्ध, कर्मकांड, उपासनाकांड इत्यादि शास्त्रांचा उदय झाला आहे. व्याकरण आणि छंद ही पौरस्त्य आर्यांची शास्त्रे तर सर्व जगतांस सर्वकालीं ललामभूत होतील अशीच आहेत. जगताच्या उत्पत्तिस्थितिलयासंबंधी आमच्या पूर्वजांनी जिज्ञासामूलक शोध किती गंभीर निरीक्षणाने केले होते, हे आपण समजून घेतल्यास आपल्या पूर्वजांची जिवंत कार्यक्षमता व बुद्धिकुशाग्रता किती प्रचंड होती, याची अल्प स्वल्प तरी कल्पना करितां येण्याची सवड या प्रस्थानभेदानें । प्राप्त होणार आहे. जिज्ञासेच्या प्रेरणेने आमच्या आर्य पूर्वजांनी ज्ञानसमुद्रांत फारच खोल बुड्या मारून तेथील ज्ञानरत्ने उद्धृत केली होती, असे निदर्शनास येईल. तर्कशास्त्रांतील पदाविवेचन, न्यायप्रणेत्या गौतमांचे प्रमाणप्रमेयांविषयींचे अगाध विचार हेच जरी नुसते समजून घेतले, तरी सुद्धां अलीकडील नैय्यांयिकांसहि तोंडात बोटेंच घालावीं लागतील ! पांचभौतिक वाद काय किंवा परमाणुवाद काय, कोणताहि घेतला तरी, तत्तत्कालीन परिस्थितीच्या मानाने कणादगौतमादिकांनी स्थापिलेल्या कल्पना या पूर्वऋषींच्या गहन व सूक्ष्म बुद्धिवैभवाची खाशी साक्ष पटवितात. कपिलमहामुनीसारखे निष्ठुर ज्ञानकतत्त्वज्ञ वीर हाता. च्या बोटांइतके तरी निर्दिष्ट करता येतील की नाही, याची शंकाच आहे. असो; पण ध्यानात ठेवावयाचे हे की, ही