पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. आपल्या शाखेचे दोन भाग करून बभ्र आणि सैन्धवायन ह्यास शिकविल्या. सैन्धवायन शाखेचे पुनः सैन्धव आणि मुंज. केश असे दोन पोटभेद झाले. ___ ह्याप्रमाणे अनेक शाखा व प्रतिशाखा श्रीविष्णुपुराणांत ( अं. ३, अ. ४-५-६) सांगितल्या आहेत. ह्यापैकी किती ग्रन्थ उपलब्ध आहेत ह्याविषयी वर हकीकत दिली आहेच, --- - - वेदांर्ग-किंना उपग्रन्थ. वेदाविषयी अति संक्षिप्त अशी माहिती वर दिली आह. आतां वेदांत सांगितलेल्या कर्माचे अनुष्ठान यथाविधि, (बरो बर व बिनचूक) व्हावे, म्हणून काही शास्त्रे चांगली अवगत असली पाहिजेत. त्यांचे ज्ञान नसल्यास कमीत चूक होण्याचा संभव आहे, आणि कमति चूक झाली तर तें सर्व कर्म निष्फळ होतें. येवढेच नाही तर त्यापासून हानिहि होते. म्हणून त्या शास्त्रांचा अभ्यास करणे अवश्य आहे. ही शास्त्रे सहा आहेत; त्यांस वेदांची षडंगें किंवा उपग्रंथ असें ह्मणतात. हे उपग्रन्थ सर्व वेदांस साधारण आहेत, म्हणून त्यांचे अध्ययन प्रत्येक वैदिकाने केले पाहिजे. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, च्छन्द आणि ज्योतिष ही वेदांची अंगें, असें मागें सांगितले आहेच. शिक्षा:- हा ग्रन्थ अगदी लहान आहे. त्यांत साठ श्लोक आहेत. हा पाणिनीच्या मतांस अनुसरून रचलेला