पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अथर्ववेद. ौच, वैतालिक व बलाक ह्या तीन शिष्यांस शिकविल्या आणि निरूक्त चवथ्या शिष्यास शिकविले. पैलाच्या बाष्कल शिष्याने आपली बाष्कल शाखा, बोध्य, आग्निमाठर, याज्ञवल्क्य व पराशर ह्या चार शिष्यांस अध्यापिली, बाप्कलि शाखच्या आणखी निराळ्या तीन शाखा झाल्या. त्यांचे अध्ययन, कालायनि, गाग्य, आणि कथाजव ह्या त्याच्या तीन शिष्यांनी केले. यजुर्वेदाच्या शाखाविषयीं ह्या पुराणांत सविस्तर माहिती नाही. सामवेदाचे जैमिनोनी अध्ययन केले; त्यांनी तो वेद आपल्या सुमन्तु पुत्रास शिकविला. सुमन्तूने आपल्या सुकर्मा नांवाच्या पुत्रांस शिकविला. सुकान सामवेदाच्या हजारो शाखा केल्या; त्यांचे अध्ययन हिरण्यनाभ कौशल्य आणि पौष्यजि ह्या दोन शिष्यांना केले. हिरण्यनाभाने या वेदाच्या १५ संहिता केल्या, आणि ह्या आपल्या पंधरा शिष्यांस शिकविल्या, ह्या शिष्यांस 'उदीच्यसामग' असे म्हणतात. दुसरे जे ह्या संहिता शिकले, त्यांस ' प्राच्यसामग' हे नांव आहे. हिरण्यनाभाच्या कृतनामा शिष्याने २४ संहिता करून त्यांचे अध्यापन आपल्या शिष्यांस केले. सुकर्माच्या पौष्यांज शिष्याने, लोकाक्षि, कुथुमि, कुसीदि आणि लांगलि ह्या चार शिष्यांस शिकवून अनेक शाखा. भेद केले. ___ अथर्ववेद सुमन्तु व्यासाजवळ शिकले. कबन्ध नांवाच्या शिष्याकडून त्याचे अध्ययन सुमन्तूने करविले. कवन्धाने अथवाच्या दोन शाखा केल्या आणि त्या देवदर्श व पथ्य ह्या दोन शिष्यांस सांगितल्या. देवदर्शाचे मौद्ग, ब्रह्मबलि, शौक्लायनि आणि पिप्पलाद, असे चार शिष्य होते. त्यांच्या चार शाखा झाल्या, पथ्याचे जांजलि, कुमुदादि आणि शौनक असे तीन शिष्य होते; त्यांच्या तीन निराळ्या शाखा झाल्या. शौनकानें