पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ प्रस्थानभेद. विचारले. मला खरोखरच माहीत नव्हता. म्हणून मी त्याला तसे सांगितले. खोटें जो बोलतो, त्याचा समूळ नाश होतो. मी खोटे बोलत नाही, असे मी त्यास सांगितले. हे ऐकून रथावर बसन तो राजपुत्र निमूटपणे निघून गेला. महाराज हा षोडशकल पुरुष कोणता ! ह्या सर्व प्रश्नांची उत्तरें पिप्पलादांनी प्रश्न विचारल्यावर लिी आहेत. ___ मांडुक्योपनिषद अगदी लहान आहे. तथापि ते फार महत्त्वाचे आहे. गौडपादाचार्याच्या प्रसिद्ध कारिका या उपनिषदाच्या आधारानेच रचिल्या आहेत. ॐकार हेच अक्षर ब्रह्म, हाच आत्मा, याची चार स्वरूपं आहेत. १ बहिःप्रज्ञ, २ अन्तःप्रज्ञ, ३ प्राज्ञ, आणि हा सर्वेश्वर सर्वाच्या उत्पत्ति, स्थिति व लय यांचे कारण आहे. श्रीविष्णु पुराणांत वेदांच्या शाखांचा अधिक विस्तार करून वर्णन केले आहे. व्यासांनी एक लक्ष वेदाचे ऋक् , यजुः, साम आणि अथर्व असे चार भाग केले, आणि ते अनुक्रमें आपल्या पैल, वैशंपायन, जैमिनी व सुमन्तु ह्या चार शिष्यांस शिकविले. पैलाने ऋग्वेदाच्या दोन शाखा करून त्या आग्निप्रमति आणि बाष्कल ह्या दोन शिष्यांस शिकविल्या. आमिप्रमतीने आपल्या मांडुकेय मुलास ती शाखा सांगितली. मडुकेयाच्या शिष्य व प्रतिशिष्यांपासून वेदमित्रशाकल्याने ह्या शावचा पाठ घेतला. शाकल्याने आपल्या शाखांचं अध्ययन पांच शिष्यांकडून कर. विले. मुद्गल, गोखल, वात्स्य, शालीय आणि शिशिर असे हे शाकल्याचे पांच शिष्य होते. शाकपुणि ह्या नांवाचा अन्य शिष्या होता, त्याने ह्या शाखेच्या तीन प्रतिशाखा करून त्या