पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अथर्ववेद. निरनिराळे प्रश्न विचारले आहेत. त्यांची उत्तरें भगवान् पिप्पलादांनी ऋषींस दिली आहेत. त्यांत प्रश्न केले आहेत, म्हणून त्यास प्रश्नोपनिषद हे नांव मिळाले. परब्रह्माचे अन्वेषण करण्याच्या हेतूने हे ऋषी पिप्पलादाकडे गेले. १ पहिला प्रश्न कबन्धी कात्यायनाने केला. भगवन् ह्या प्रजा कोठून निर्माण झाल्या ? २ भार्गव वैदर्भि ऋषींनी दुसरा प्रश्न केला. भगवन् कोणते देव या प्रजांचे विशेष रीतीने धारण करतात ? त्यापैकी कोणते देव त्यांना बुद्धी. न्द्रिय वगैरे देऊन त्यांचे प्रकाशन करतात. त्यांपैकी कोणता देव वरिष्ठ आहे ? ३ तिसरा प्रश्न कौसल्य आश्वलायनाने विचारला. महाराज ! प्राणाची उत्पत्ति कोठून झाली ? तो शरीरांत कसा येतो आणि स्वतःला विभागून शरीरांत कसा रहातो ? बाहेर कसा जातो? आधिभौतिक, आधिदैवत आणि आध्यात्म कसें धारण करतो ? ४ सौरायणी गार्याने चवथा प्रश्न विचारला. भगवन् ! या पुरुषाचे ठायीं कोण जागतात ! कोण झोप घेतात ! कोणास स्वप्न दिसते ! कोणाचे ठिकाणी ह्या सर्वाचे प्रतिष्ठापन आहे ! ५ शैष्य सत्यकाम पांचवा प्रश्न विचारतो. महाराज ! ह्या मनुष्यांमध्ये कोणी आमरण ओंकार स्वरूपाचें ध्यान करावें? अशा चिंतनानें कोणता लोक प्राप्त होतो ? ६ वा प्रश्न सुकेशा भारद्वाजाने केला आहे. तो ह्मणाला. भगवन ! हिरण्यनाभ नांवाचा कौसल्य राजपुत्र माझ्याकडे आला आणि षोडशकल पुरुष तुला माहीत आहे काय ? असें त्याने मला