पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- प्रस्थानभेद. अक्षर ब्रह्माचे पूर्ण ज्ञान ज्या विद्येने होते ती परा विद्या. अपरा विद्येचे फल संसार आहे. परा विद्येचें मोक्ष आहे. इष्टापूर्तादि कर्मे केल्याने मनुष्य, पुण्य आहे तोपर्यंत, स्वर्गात रहातो, पुण्य संपल्यावर पुनः पृथ्वीवर जन्म घेतो. पग विद्येने मोक्ष प्राप्त होतो, इत्यादि. दुसऱ्या मुंडकांत अक्षर ब्रह्माचे स्वरूप सांगितले आहे आणि ही सर्व सृष्टि त्यापासून झाली आहे, असे प्रतिपादन केले आहे. ॐ हे धनुष्य करून त्याच्याशी आत्मारूपी शराचें संधान करून (जोडून) तो शर ब्रह्म लक्ष्यावर वेधावा. ब्रह्म हे सत्य, अमृत आहे. हेच चोहोंकडे आहे, हेच विश्व, इत्यादि गोष्टी ह्या मुंडांत सांगितल्या आहेत. ब्रह्मज्ञान झाले म्हणजे संसारग्रन्थी (वासनादि) तुटून जातात आणि सर्व संशय नाहोंसे होतात. तिसऱ्या मुंडकांत जीवात्मा आणि परमात्मा, यांचे ऐक्य दोन पक्ष्यांचे रूपक करून दाखविले आहे. दोन सुपर्ण संयुक्त, मित्र, असे दोन पक्षी आहेत. एक झाडावर बसून पिप्पल खात असतो, दुसरा तें पहात असतो. म्हणजे जीवात्मा संसारभाग भोगति असतो, आणि परमात्मा तटस्थ असतो, इत्यादि. मुमुसूनें निष्काम होऊन ब्रह्मज्ञान मिळविण्याची खटपट केली पाहिजे. चक्षु, वाचा, तप, कर्म, किंवा अन्य देवांच्या उपासनेने ब्रन दिसणार नाही. केवळ ज्ञानप्रसादाने विशुद्धसत्त्व होऊन आणि ध्यान करून ते निष्कल ब्रह्म प्राप्त होईल. प्रश्नोपनिषदांत सहा ऋषींनी भगवान् पिप्पलादास सहा