पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अथर्ववेद. अथर्ववेदांत येणारी उपनिषदें बहुतेक सर्व वेदकालानन्तर प्रसंगानुसार रचलेली असावीत, असे दिसते. इतर वेदांतील उपनिषदें त्या त्या वेदांच्या ब्राह्मणांत किंवा आरण्यकांत आलेली आहेत. त्यांची नांवें ही वेदावरून किंवा मंत्रावरून पडला आहेत. त्यांतील आत्मतत्त्वज्ञानाविषयी विचारांची सरणि ही विशिष्ट प्रकारची असते. अथर्ववेदाच्या उपनिषदांत दोन तीन उपनिषदांशिवाय, कोठेहि वर सांगितलेले उपनिषदाचे स्वरूप दिसून येत नाही. सामान्यतः अथर्वण वेदांच्या उपनिषदांचे चार भाग करता येतील. (१) दुसऱ्या वेदांतील उपनिषदांसारखी व त्यांच्या पद्धतीने लिहिलेली. (२) ॐ हेच ब्रह्म मानून योगाभ्यासाने ब्रह्मसाधन करण्यास सांगणारी, (३) ह्या मोक्षासाठी संन्यासाश्रम धारण करण्यास सांगणारी व त्याचे धर्म प्रतिपादन करणारी, आणि ४ था भाग आपापल्या विशिष्ट आराध्य देवता, ह्याच ब्रह्म आहेत, त्यांचे उपासनेने ब्रह्मप्राप्ति होते, असें म्हणणारी, अशी चार प्रकारची उपनिषदें आहेत. ह्यांत पहिल्या वर्गात येणारी अशी मुण्डक, प्रश्न आणि मांडुक्य ही तीनच उपनिषदें आहेत. ___ मुंडकोपनिषदाची तीन मुंडे ( भाग ) आहेत. आणि प्रत्येक मुंडांत दोन खंडे आहेत. अंगिरा ऋषींनी हे गौतमास शिकविले आहे. पहिल्या मुंडांत परा आणि अपरा ह्या दोन विद्यांचे ज्ञान करून घ्यावे, असा उपदेश केला आहे. ऋग्वेदादि सर्व मन्यांत सांगितलेली अपरा विद्या होय;