पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. विषयानुक्रमाप्रमाणे या भागांत ब्राह्मण आले आहे. ह्या ब्राह्मणाचा पुष्कळसा भाग, ऐतरेय, तैत्तिरीय, शतपथ, मैत्रायणी, आणि पंचविंश, या ब्राह्मणांतून घेतला आहे. गोपथ ब्राह्मण वैतान श्रौतसूत्र झाल्यावर, ग्रथित केले असावें; त्यांत श्रौतसूत्राचा अनुक्रम घेतला आहे. अथर्ववेदाची वीस कांडे आहेत, असे त्या वेदाचे प्रातिशाख्यांत लिहिले नाही. ह्या ब्राह्मणांत अथर्वाची २० कांडे आहेत, असें मानिले आहे. ह्या ब्राह्मणांत शिवाचें नांव येते, इत्यादि गोष्टीवरून इतर ब्राह्मणें ज्याकाली झाली, त्या कालानन्तर हे ब्राह्मण रचलें असावे, असा तर्क आहे. या ब्राह्मणाचे आरंभी ॐ कारं पृच्छामः इत्यादि असें एक ब्राह्मण आहे. त्यास प्रणवोपनिषद म्हणतात, अथर्ववेदाची उपनिषदें* ह्या नावाखाली अनेक उपनिषदें येतात. ५२ उपनिषदें अथर्ववेदाची आहेत, असे कोणी म्हणतात. या बावन्नांत दुसऱ्या वेदांची उपनिषदे आहेत. कोणी ३७ - ३८आहेत असे मानतात. त्यापैकी २७ सांचाच अन्तर्भाव या उपनिषदांत होतो, असे काहींचे म्हणणे आहे. मुसलमानी साम्राज्याच्या वेळी विद्वान गृहस्थांनी एक अल्लो. पनिषद केले आहे. ___ * टीप:- मुंडक, प्रश्न, ब्रह्मविद्या, क्षुर का,चुलिका, शीर, अथवशार्ष, गर्भ, मह, ब्रह्मः प्राणाग्निहोत्र मांडक्य, नीलरुद्र, नादविदु, ब्रह, ब दु, अमृतबिंदु, ध्यानबिंदु, तेजोबिंदु, यो गौशखा,ये गतत्व, आहणेय, कंठश्रुति, पिंड, आत्मा, नसिंहतापिनी, नारायण, सर्व, हंस, परमहंस, गरुड, भस्म, रामतापिनी, केवल, जाबाल, आणि आश्रम, याशिवाय गणेशतापिनी, गणपति अथर्वशीर्ष इत्यादि आहेत,