पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अर्थवेवद. सहावा प्राण, त्याचे नांव प्रिय आहे. अपरिमित नांवाचा सातवा प्राण; तो ह्या सर्व प्रजा आहेत. अशा प्रकारचे व्रात्याचे वर्णन आहे. १६ व १७ कांडे अगदीच लहान आहेत. यांत आमच्या विद्वेष्ट यांचा नाश आणि आमचा उत्कर्ष होऊ द्या, अशा प्रार्थना आहेत. सोळाव्यांत एक लहानसे स्वप्नसूक्त आहे. जे फार चांगले आहे. १८ व्या कांडांत और्ध्वदेहिक संस्कार व पितरें, याविषयी मंत्र आले आहेत. हेहि ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलांतले आहेत. १९ वें कांड खिल किंवा परिशिष्ट यासारखेच आहे. २०वें कांड सोमाविवयीं आहे हे वर सांगितलेच आहे. यांत कुंतापाध्याय आहे. तो ऋग्वेदांतील · दान तुती ' सारखा आहे, असें म्हणतात. त्या अध्यायाची दहा सूक्ते आहेत. ( १२६१३६). ही दहा सूक्तं आणि ४८ व ४९ वीं सूक्ते याशिवाय बाकीची सर्व सूक्ते ह्या कांडांत ऋग्वदांतून उतरून घेतली आहेत. अथर्व वेदास अथर्वण वेद अथर्वागिरस, भृग्वांगिरस आणि ब्रह्मवेद अशी नावे आहेत. ___ अथर्वण वेदाचे ब्राह्मणास 'गोपथ ' ब्राह्मण म्हणतात. या ब्राह्मणाचे दोन भाग आहेत. पूर्वार्धात पांच अध्याय आहेत आणि उत्तरार्धात सहा अध्याय आहेत. पूर्वभागांत विशिष्ट यज्ञादिकाचे प्रतिपादन पद्धतशीर केलेले आहे, असें नाही. अथर्ववेदाची प्रशंसा आणि 'ब्रह्मा' नावाचे ऋत्विजाची महती ह्या दोन गोष्टी या भागांत मुख्यतः वर्णिल्या आहेत. उत्तरार्धात ब्राह्मण आहे, 'वैतान' श्रौतसूत्रांत सांगितलेल्या