पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ प्रस्थानभेद. जन्म, विवाह, और्ध्वदेहिककर्म, अशा गृह्य संस्कारांचे प्रति. पादन केलेले आहे. यज्ञकर्मातील मंत्र कांहीं एक नाहीत. २० व्या कांडांत मात्र सोमयागाचे मंत्र आले आहेत, ते सर्व ऋग्वेदांत आहेत तसेच, येथे घेतलेले आहेत. यज्ञयागादिश्रौत कर्माशी संबन्ध जोडण्यासच जणूकाय हे कांड मागून या वेदांत अन्तर्भूत केलेले असावें. ही सोमसूक्ते एकंदर १३१ आहेत. सुमारे १२०० सूक्तें ऋग्वेदांतून घेतली आहेत. ती मुख्यतः दहावें, पहिले, व आठवें, या मंडलांतून घेतली आहेत. यजुर्वेदाप्रमाणे या वेदांतहि गद्यात्मक ग्रन्थ आहे. एकषष्ठांश असा गद्य ग्रन्थ असावा. पहिल्या तेरा कांडांतील विषय अनुक्रमाने किंवा संगतवार नाहीत. इकडे तिकडे मिसळलेले आहेत. पुढल्या पांच कांडांत विषय पद्धतशीर व सुसंगत आहेत. १४ व्या कांडांत विवाहसंस्काराचे मंत्र आहेत. हे ऋग्वेदांतील दहाव्या मंडलांतील घेतले आहेत. १५ व्या कांडांत 'व्रात्याची ' महती व वैभव गाईली आहेत. व्रात्य म्हणजे साक्षात् ब्रह्मच आहे. या व्रात्यस्वरूपाची थोडीशी कल्पना यावी, म्हणून पंधराव्या कांडांतील पंधराव्या सूक्ताचा अर्थ खाली दिला आहे. ' ह्या व्रात्याचे सात प्राण, सात अपान आणि सात व्यान आहेत. ' ऊर्ध्व' नावाचा पहिला प्राण हा अग्नि होय; याचा प्रौढनामा दुसरा प्राण, तो आदित्य आहे. अभ्यूढ हा तिसरा प्राण, तो चंद्रमा आहे. चवथा प्राण विभू हा पावमानसोम होय. योनि नांवाचा पांचवा प्राण तो आप (पाणी) आहे. सर्व पशु हे त्याचा