पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अथर्ववेद. अथर्ववेद. - - - होता, अध्द आणि उद्गाता, या यज्ञांतील तीन मुख्य ऋत्विजांचे मंत्र ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद, या वेदांत आले आहेत. यांशिवाय दुसरे कोणतेहि ग्रंथांत ते मंत्र नाहीत. ह्या तीन वेदांचाच यजनाशी संबन्ध असल्यामुळे त्यांस त्रयी म्हणतात. अथर्व वेदाचा यज्ञाशी कांहीं एक संबन्ध नाही. तरी पण तो ब्रह्माऋत्विजाचा वेद आहे, असे म्हणतात; यज्ञांत ब्रह्माचें काम केवळ अध्यक्षाचे आहे. . ___ अथर्ववेदाचे नऊ भाग किंवा शाखा आहेत. त्यांची नांवें येणेप्रमाणेः-१ पप्पला, २ दान्ता, ३ प्रदान्ता, ४ स्तौता, ५ औंता ६ ब्रह्मदायश (वरा बलं!), ७ शौनकी, ८ वेददर्शी, ९ चरणविद्या (विध ? ). अर्थववेदाचे पांच कल्प आहेत. नक्षत्रकल्प, विधानकल्प विधिविधानकल्प, संहिताकल्प आणि शान्तिकल्प, असे ते कल्प आहेत. या नऊ शाखा किंवा भेदापैकी शौनकी आणि पैप्पल पिप्पिलादाची ) ह्या दोनच शाखांचे ग्रन्थ उपलब्ध आहेत, या दोन्ही संहितेत फरक नाही. शौनकी संहितेत २० कांडे, ३४ प्रपाठक, (१९-२० कांडांत प्रपाठक नाहींत.) १११ अनुवाक, ७३१ सूक्ते आणि ५८४९ ऋचा किंवा मंत्र आहेत. कां. ८, १४ आणि १७ व १८ यांत 'दशिका' असा एक पोटभाग केलेला असतो. या वेदांत मुख्यतः अभिचार, (जारण, मारण, उच्चाटण इत्यादिकांचे मंत्र ) आणि