पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. नाही. 'चवदा विद्या आणि चवसष्ट कला' ही शब्दश्रेणी कदाचित् पुष्कळांस ठाऊक असेल; पण त्या विद्या कोणत्या, हे अधिकारी वाणीने फारच थोड्यांस सांगता येईल. ही सद्यःकाली स्वाभाविक झालेली अज्ञानदशा संपावी व प्राचीन विद्यांचा नामनिर्देश करितां येऊन त्या विद्यांचे स्थूलस्वरूप तरी समजावें, या उद्देशाने माझे मित्र प्रो० भाऊसाहेब लेले, यांनी हे 'प्रस्थानभेद' नामक लहानसें पुस्तक लिहिले आहे. प्रो० लेले, यांचे स्तुतिस्तोत्र गाण्याचा माझा हेतु नाहीं ! त्यांचे मजवर जें अबाधित बंधुप्रेम आहे, तेंच मला पुढील दोन शब्द लिहिण्याची प्रेरणा करित आहे. 'वेदांत नाही, ते जगतांत नाही' अशी सांप्रदायिक म्हण आहे, व ती बख़ुशी खरीही आहे. पहा की यज्ञयागास लागणाऱ्या दिनशुद्धीसाठी वैदिक ज्योतिष सिद्ध झाले. स्थंडिलें बांधण्यासाठी व मंडपविरचनेसाठी स्थापत्य शास्त्राची योजना झाली. मंत्रांतील वर्णाचा उच्चार स्पष्ट स्वच्छ व शुद्ध व्हावा, एतदर्थ 'शिक्षानामक' वेदांग प्रकट झाले. शरीरप्रकृतीच्या योगक्षेमासाठी आयुर्वेद, आणि सामाजिक संस्था ठीक चालाव्या म्हणून धनुर्वेद अवतीर्ण झाले. इतर व्याकरण, कल्प, निघंटु (निरुक्त), छंद, यांविषयींहि असेंच म्हणता येईल. कर्म वाढत गेलें तदनुसार ब्राह्मणें नामक वेदभागाची योजना अस्तित्वांत आली. मंत्रांचे व मंत्रोद्दिष्ट कर्माचे प्रामाण्य ठरविण्यासाठी उपासनाविद्येचा व तत्त्वज्ञानाचा उदय झाला. याप्रमाणे