पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- प्रस्थानभेद. प्रतिपादन केले आहे. सातव्या अध्यायांत सनत्कुमारानी नारदांस उपदेश केला आहे. नामाहून वाणी चांगली, वाणीहून मन मोठे, मनाहून संकल्प, अशा रीतीने पुढे चितविज्ञानादिकांच्या पाहिन्या लावून सवीत उत्तम भूमा आहे असे सांगितलें आहे, भूमाचे स्वरूप सांगन त्याची उपासना करावी, असा उपदेश केला आहे. आठव्या अध्यायांत ह्या लहानशा हृदयरूपी ब्रह्मपुरांत जो आत्मा आहे, त्याचे आणि परमात्मा याचे निरूपण करून ब्रह्मसाधनाचा मार्ग सांगितला आहे. जागति, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्थांचे वर्णन केले आहे. सुषुप्तीत विषयी आणि विषय यांतील भेद राहात नाही. तलवकार किंवा केन उपनिषद हे सामवेदांतील दुसरें उपनिषद आहे. हे अगदी लहान आहे. पहिला भाग पद्यात्मक आहे, त्यांत सगुण व निर्गुण ब्रह्माचे वर्णन आहे. सगुण ब्रह्माची उपासना आपण करतो, निर्गुणब्रह्म डोळ्याला दिसत नाहीं, वाणीला सांगता येत नाही. बुद्धीला त्याची कल्पना करवत नाही. असे त्याचे स्वरूप आहे. दुसऱ्या भागांत केवळ ब्रह्माच्या कृपेने व त्यापासूनच वायु, अग्नि, इन्द्रादिदेवतांचे सामर्थ्य त्या त्या देवतेंत आले आहे असे यक्ष संवादावरून दाखविले आहे. कात्यायन आणि पाररकर यांनी या वेदाची सूत्रे केली आहेत. ह्यांत श्रौत आणि गृह्य विषयांचे वर्णन आहे.