पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामवेद. प्त होतो. प्रजा उत्पन्न करण्याच्या हेतूने प्रजापतीने ध्यानव्रत केले, त्याला त्रयी प्राप्त झाली. त्रयीचें ध्यान केल्यावर व्याहृती (भूः भुवः स्वः ) दिसल्या; व्याहृतींच्या ध्यानानंतर ओंकार साक्षात्कार झाला. ओंकार हा सर्व जगताचे (देठ) आहे. त्याची उपासना केली असतां अमृतत्व मिळते. तिसऱ्या अध्यायांत ब्रह्म हे सर्व विश्वांतील आदित्य आहे. ब्रह्म प्रत्येकांचे हृदयांत आहे. ब्रह्म कसे साधन करून घ्यावे इत्यादि गोष्टींचे निरूपण येथे केले आहे. ब्रह्माण्डाची उत्पत्ति कशी झाली हेहि वर्णिले आहे. चौथ्या अध्यायांत वायु, प्राण इत्यादिकांचे वर्णन आहे. आणि मरणानन्तर जीवात्मा ब्रह्म स्वरूपाकडे कसा जातो, हे निरूपिलें आहे. पांचव्या अध्यायाचे पूर्वार्धात पुनर्जन्म किंवा जीवात्म्याची पुनरावृत्ति, तप करणारे लोक मेल्यावर आर्चिष मार्गाने सूर्यलोकास कसे कसे जातात; इष्टापूर्ति वगैरे कर्मे करणारे धूममार्गाने चंद्रलोकांत कसे जातात; पुण्य संपल्यावर कोणत्या मार्गाने ते जीव कोणत्या योनीत जन्म घेतात, इत्यादि गोष्टींचे निरूपण येथे केले आहे. ह्या अध्यायाचे उत्तरार्धात औपमन्यवादि पांच गृहस्थ आणि उद्दालक यांचा कैकेयाशी संवाद आहे; व अग्निहोत्राचे फल सांगितले आहे. साहाव्यांत सर्व सृष्ट वस्तू असत् आहेत. सत् हेच एक खरे आहे. ह्यापासून त्याच्या इच्छेनें महाभूते झाली. जीवात्मा होऊन हैं सत् त्यांत शिरून सर्व विकार उत्पन्न झाले आहेत. सत् हेच आत्मा. तत्त्वमसि इत्यादि विषयांचे