पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - प्रस्थानभेद. अशा प्रकारची अद्भुत कृत्ये किंवा गोष्टी घडून आल्या असतां, त्यांचे दुष्ट व अनिष्ट परिणामांचे निवारण करण्यास उपाय ह्या अद्भुत ब्राह्मणांत सांगितले आहेत. सामविधान ब्राह्मणांत कोणत्या कर्मात कोणकोणती सामें गावीत हे सांगितले आहे. 'देवता अध्याय' ब्राह्मणांत साम वेदांतील प्रधान देवतांची नावे दिली आहेत आणि प्रत्येक देवतांची सामसूक्तं कोणती व त्या देवतेची विशिष्ट छन्दें कोणती यांचे निरूपण आहे. वंशब्राह्मणांत सामवेदाचे आचार्यांचे वंश दिले आहेत. 'संहितोपनिषद ' या नांवाच्या ब्राह्मणांत एतरेय ब्राह्मणाच्या तिसऱ्या पंचिकेत सांगितल्याप्रमाणे, वेद कसा ह्मणावा याविषयी नियम सांगितले आहेत. छान्दोग्य व केन ही उपनिषदें सामवेदीय ब्राह्मणांत आली आहेत, असें वर सांगितले आहेच. ही फार प्रसिद्ध आहेत. छान्दोग्यांत आठ अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायांत खंडे असतात. पहिल्या दोन अध्यायांत सामांची प्रशंसा व त्यांचीच उपासना करावी असे वर्णिले आहे. सारांश, हिंकार, प्रस्ताव, उद्गीथ, प्रतिहार, आणे निधान ही पांच सामें सर्व चराचर जगत् आणि त्रयी विद्या आहेत, असे निरूपण येथे केले आहे. केवल सामोपासनेने मोक्ष प्राप्त होत नाही, त्याच्या प्राप्तीसाठी ओंकाराची उपासना केली पाहिजे. अध्ययन, यज्ञ आणि दान ही तीन धर्मस्कंध आहेत. ब्रह्मचारी, गृहस्थ आणि वानप्रस्थ यांकडून हे धर्म पाळले जातात, त्यांस पुण्यलोक मिळतात. ब्रह्मस्थासच मोक्ष ( अमृतत्व )