पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - - सामवेद. जैमिनीय, ४ छान्दोग्य, ५ सामविधान, ६ संहितोपनिषद ब्राह्मग, ७ देवताध्याय, आणि ८ वंशब्राह्मण. तलवकार ब्राह्मणाचे पांच भाग किंवा कांडे आहेत. पहिल्या तीन भागांत यजनकम व अनुष्ठाने यांचा विचार केला आहे. चवथ्या भागांत आरण्यकासारख्या गोष्टी असून आचायांच्या दोन अनुक्रमणी, प्राणाची उत्पत्ति, आणि सावित्री यांच्या संबंधी विचार निर्दिष्ट केले आहेत. यांशिवाय सुप्रसिद्ध 'केनोपनिषद्' ह्याच भागांत आहे. तलवकार ब्राह्मणाच्या पांचव्या भागास · आर्षेय ब्राह्मण ' म्हणतात. या ब्राह्मणांत मंत्रद्रष्टे ऋषींची नांववारी दिली आहे. तांड्य किंवा पंचविंश ब्राह्मण यांस प्रौढ ब्राह्मण असेंहि नांव आहे. या ग्रन्थांत २५ अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायांत खंडें असतात. त्यांत सर्व सोमयागांचे वर्णन आहे. लहानशा इष्टीपासून अनेक वर्षे चालू राहणाऱ्या सर्व सोमयागांचे प्रतिपादन या ब्राह्मणांत केलेले आहे. सरस्वती आणि दृषद्वती या नद्यांच्या काठी झालेल्या यज्ञांची वर्णनें यथें आली आहेत. १७ व्या अध्यायांत व्रात्य-यक्ष-स्तोम वर्णिला आहे. त्या यज्ञाने हीन किंवा पतित लोक पावन होतात. अब्राह्मण ब्राह्मण होतात. षड्विंश ब्राह्मण हे पंचविंश ब्राह्मणाचे परिशिष्टच आहे. त्यांत सहा अध्याय किंवा पाठक आहेत. त्यांतील शेवटच्या सहाव्या अध्यायास अद्भुत ब्राह्मण ह्मणतात. यांत अद्भुत शांतीचीं अनुष्ठाने सांगितली आहेत. देवतांच्या मूर्ति, हसू, रडू लागल्या किंवा भंगल्या