पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. वायु, मरुत्, वरुण, त्वष्टा, आंगिरा, पूषा इन्द्राग्नी, वेन, विश्वेदेव, मित्रावरुणौ. वैश्वानर, तनूनपात्, सरस्वती, ब्रह्मणस्पति, प्रजापति, इत्यादि देवता आल्या आहेत. या वेदांतील मंत्रद्रष्टे ऋषी ऋग्वेदांतील ८ व ९ मंडलांतीलच असावयाचे. भरद्वाज, मेवातिथि, उशन, वत्स, वामदेव, मधुच्छन्द, शुनःशेप, वसिष्ठ, कण्व, विश्वामित्र, कश्यप (असित, देवल )सौभरि, वसूयव, आत्रेय, गोपवन इत्यादि अनेक ऋषींची नांवें आली आहेत. ह्या वेदाचे आर्षय ब्राह्मणांत- ऋषींची नामावळी दिली आहे. गायित्री, बृहती, त्रिष्टुम्, जगती, अनुष्टुम् , पंक्ति, उष्णिक् , ककुप् ही छंदें या वेदांत आली आहेत. घड्ज, ऋषभ, गांधार, इत्यादि सप्तसुरांपैकी कोणत्यातरी एका नर्दिष्ट केलेल्या सुरांत प्रत्येक ऋचा ( साम) म्हणावयाचे असते. कोणत्या सुरांत कोणती ऋचा म्हणावयाची, हे दशतीच्या किंवा प्रपाठकाच्या भागांत आरंभी सांगितले असते. सामगायनाचे ३६ प्रकार आहेत. प्रस्ताव, उद्गीथ, प्रतिहार, उपद्रव, निधान, हिंकार, प्रणव, अशति, स्तोभसाम, आदिमध्य निधान, पदविभाग, ऋग्व्यूह इत्यादि त्यांची नांवें एंकण्यांत येतात. अग्नीचे सूक्तांस निधान म्हणतात, इंद्राचे सूक्तांस प्रस्तुत, आणि प्रजापतीचे मूकांस म्वर अशी नावे आहेत. 'सामवेदाची ब्राह्मणे' या नावाने प्रसिद्ध अशी अनेक ब्राह्मणे आहेत. त्यांपैकी आठांची नांवे येणेप्रमाणे. १ पंचविंश किंवा ताण्ड्य, २ षड्विंश, ३ तलवकार किंवा