पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामवेद. “ विदा मघवत् विदा गातुम् ” असा या आर्चिकाचा आरंभ आहे. दुसन्या अध्यायांत ( उत्तराचिकेंत ) नऊ प्रपाठक आहेत. प्रत्येक प्रपाठकाचे दोन भाग केलेले असतात. त्यांस प्रथमा व द्वितीया प्रपाठक अशी नावे आहेत. सहापासून नऊ प्रपाठकांचे प्रत्येकी तीन तीन भाग केले आहेत. त्यांस प्रथम द्वितीय आणि तृतीय अर्ध असें म्हणतात. दुसऱ्या एका छापील पुस्तकांत ह्या अध्यायाचे अकरा प्रपाठक केले आहेत आणि प्रत्येक प्रपाठकाचे दोन दोनच भाग पाडले आहेत. शाखाभेदामुळे संहितेत असा फरक पडला आहे की काय, हे समजण्यास सध्या मार्ग नाही. या सर्व प्रपाठकांत एकंदर ४०४ सामें आहेत. गायन या दृष्टीने सामवेदाचे आर्चिक आणि स्तौमिक असे दोन भाग करता येतील. आर्चित 'वेयगान' आणि ' आरण्यगान ' अशी दोन प्रकारची गायने असतात. स्तौभिकाचेही दोन भाग करतात, त्यास — उहगान ' ' आणि उह्यगान' अशी नावे आहेत. वेयगान म्हणजे ग्रामगेयगान. ह्यांतील प्रत्येक सूक्तास निरनिराळी नांवें दिली आहेत. बृहत्साम, रथंतर, वैराज, वैरुप्यसाम, रवैतसाम, दीर्घसाम, वामदेवसाम, पंचनिधान इत्यादि बरीच नांवे आहेत. पहिल्या अध्यायांत अग्नि, पवमानसोम, अश्विनीकुमार आणि विशेषतः इन्द्र, या देवता आल्या आहेत. दुसऱ्या अध्यायांत ह्या देवता असून आणखी, सूर्य, आदित्य, उषा, । ugong