पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० प्रस्थान द. (न? )योग्य, (ज्ञा )नयोग्य,' असे भेद चरणव्यूहांत सांगितले आहेत. राणायणीयाचे नऊ भेद आहेत. राणायणीय, शाठ्यान्तवेय, शाठ्यमुद्गल, खल्वल, महाखल्वल, लांगल कौथ( थू ? )म, गौतम, आणि जैमिनीय, ही त्या भेदांची नावे आहेत. यापैकी राणायणीय आणि कौथूम या दोन शाखांचेच ग्रन्थ उपलब्ध आहेत. कौथूम शाखेचे ब्राह्मण गुजराथ व उत्तरेकडील भाग यांत आहेत. राणायणी शाखेचा प्रचार दक्षिणेत, तेलंगण व द्रविड देशांत आहे, असें म्हणतात. सध्यां सामवेदी शाखा लुप्तप्राय झालीशी दिसते. ह्या प्रान्तांत सामवेदी ब्राह्मण आढळण्यांत येत नाहीत. उपलब्ध असलेल्या दोन शाखांच्या संहितेंत फारसा फरक नाही. सामवेद संहितेचे दोन भाग आहेत. त्याला अध्याय किंवा आर्चिक म्हणतात. पहिल्या अध्यायास पूर्वार्चिक आणि छन्दोग प्रकृतिऋक् , अशी दोन नावे आहेत. या अध्यायांत सहा प्रपाठक आहेत. प्रत्येक प्रपाठकांत दहा दशति असतात. प्रत्येक दशतींत सुमारे दहा दहा ऋचा ( साम ) असतात. सहाव्या प्रपाठकांत कांहीं पुस्तकांत नऊच दशति आहेत. परंतु अजमीरांत छापलेल्या पोथींत ह्या प्रपाठकांत चवदा दशति दिल्या आहेत. ह्यांत ५५ साम (ऋचा) अधिक आहेत. ह्या ऋचा धरून पहिल्या अध्यायांत एकंदर ६४० सामसंख्या आहे. याशिवाय महानाम्न्यार्चिक या नांवाचा एक स्वतंत्र आर्चिक आहे. ह्यांत दहा साम आहेत,