पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामवेद. सामवेद. । उद्गातृ ऋत्विजांचा सामवेद आहे. सोमयागांत साम म्हगण्याचं काम म्हणजे गाण्याचे काम उद्गात्याचे असतें. ही सामें ( गाण्याचे मंत्र ) बहुतेक सर्व ऋग्वेदाच्या आठव्या आणि विशेषतः नवव्या मंडलांतून घेतलेली आहेत. आठव्या मंडलांत प्रगाथा आहेत आणि नव मंडल सर्वस्वी पवमान सोमविषयक असल्यामुळे त्या मंडलांतून सामवेदांत ऋचा घेणे हे उचितच आहे. सामवेदांत एकंदर मंत्र (ऋचा), १५४९ आहेत. ह्या ऋचांपैकी पंचाहत्तर कायत्या ऋषींनी नवीन केल्या आहेत. बाकीच्या सर्व ऋग्वेदांतून घेतल्या आहेत. विशिष्ट कर्मास जी सामें योजिली असतात, त्यांचा संग्रह त्या त्या कर्माप्रमाणे निरनिराळा करून निराळ्या दशतींत किंवा प्रपाठकांत ती सामें ग्रथित केली आहेत. यामुळे ऋग्वेदांतील ऋचांचा अनुक्रम सामवेदांत असतोच, असे होत नाही. चरणव्यूहांत सामवेदाच्या हजारो शाखा किंवा भेद होते असे लिहिले आहे. स्वरांचे प्रस्तार नानाविध होत असल्याकारणाने एकच साम गाण्याच्या निरनिराळ्या रागरागिणींत म्हणता येईल. या कारणास्तव सामवेदाचे हजारो भेद होण्याचा संभव आहे. हे बहुतेक सर्व भेद इन्द्राने नष्ट करून टाकले असे त्या ग्रन्थांत लिहिले आहे. आसुरायणीय, सुरायगीय, प्रांजलि, रुप्रैर्नवी (?)या, प्रान्तरेवेय, प्राची