पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ प्रस्थानभेदः मुलगा भरत, व शकुंतला, यांच्या गोष्टी शतपथ ब्राह्मणांत आल्या आहेत. पुरूरवाची गोष्ट विस्तृत रीतीने सांगितली आहे. मनु, मत्स्य व मनूची नौका ही गोष्टही या ब्राह्मणांत सांगितली आहे. एकदां एक मासा मनकडे आला, आणि माझें पोषण कर असे तो मनूला म्हणाला. मनूने त्याचे पोषण केलें, तो मासा मोठा होतां होतां विश्वायेवढा झाला. त्याच्या सांगण्यावरून मननें एक नौका तयार केली. ही त्याने मत्स्यशंगास बांधून ठेविली. प्रलय झाला त्यावेळी मनु या नौकेत बसून राहिला. नंतर त्यापासून पुढे सर्व सृष्टि उत्पन्न झाली. ह्या गोष्टीचे वर्णन मत्स्यपुराणाचे आरंभीच फार विस्ताराने केले आहे. बृहदारण्यक हे उपनिषद सर्व उपनिषदांहून मोठे आहे आणि त्यांत आलेल्या विषयावरून त्याची महती, सर्वांहून अधिक मानली आहे. याज्ञवल्क्य, जनक आणि त्यावेळचे नामांकित विद्वान ब्राह्मण याज्ञवल्कयाच्या दोन स्त्रिया ह्या सर्वांचा संवाद फार उत्कृष्ट आहे. तत्त्वशास्त्राचे विचारांत त्यावेळी पुष्कळ प्रगति झाली होती, असें त्यावरून दिसते. सर्व सृष्टि एका तत्त्वापासून विकास पावली आहे ही बुद्धि दृढ झालेली होती. ' ईशावास्य ' हे एक दुसरें उपनिषद वाजसनेय संहितेत शेवटी आहे असें वर सांगितलेच आहे. हे उपनिषद सर्वात लहान आहे. यांत १७ च मंत्र आहेत. आत्मा आणि ब्रह्म यांचा विचार त्यांत केला आहे. आत्मज्ञानी आणि अनात्मज्ञानी यांच्यांतील भेद यांत दाखविला आहे. वेदांताचं सारच हे उपनिषद आहे असें ह्मणण्यास हरकत नाही.