पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुक्लयजुर्वेद. स्पष्टीकरण ही त्या नऊ कांडांत केली आहेत. दाहाव्या कांडांत अग्नीचे रहस्य वर्णिलें आहे. आकराव्या कांडांतील आठ अध्यायांत मागील सर्व यजनप्रकरणांचे पुनरालोकन केल्यासारखे आहे. १२ आणि १३ ही कांडे परिशिष्ट किंवा खिलकांडासारखी आहेत. १४ वें कांड हे या ब्राह्मणांतील आरण्यक होय. यांतील शेवटच्या सहा अध्यायांत बृहदारण्यक उपनिषद् आहे. ह्या शाखेत अग्निचयनादि कर्मासंबन्धाने शांडिल्य हाच प्रमाण मानला आहे. बाकीच्या विषयासंबन्धानें याज्ञवल्क्यच प्रमाण आहे. शतपथ ब्राह्मणांत अर्हत् , श्रमण, प्रतिबुद्ध अशी नांवें येतात. गौतमाचेंहि नांव वारंवार येतें. गौतम कुळांत शाक्य मुनींचे जन्म झाले, अशी परंपरा चालत आली आहे. जनकाच्या दरबारांत धर्मासंबंधी वादविवाद होत असत. असे येथे सांगितले आहे. इत्यादि गोष्टीवरून बुद्ध धर्माच्या विचारांचे व त्याच्या तत्त्वाचे बीज अल्परूपांत तरी त्यावेळी प्रगट झाले असावे, असे दिसते. सांख्यतत्त्वाचे प्रतिपादनास याच काळी आरंभ झाला असावा. त्या मताचा कट्टा अभिमानी आसुरि होता. त्याचे नांव या ब्राह्मणांत आले आहे. जन्मेजय राजाचें नांव या ग्रन्थांत आले आहे. परंतु पांडवासंबन्धी उल्लेख कोठेहि नाही. अर्जुन हे नांव आले आहे. परंतु तें इंद्राचे विशेषण आहे. महाभारतातील अर्जन हा इंद्राचाच अंश होता. ह्मणून इंद्राचे हे नांव याला दिले असावें. पुरूरवा आणि उर्वशी, दुप्यन्त त्याचा