पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुक्लयजुर्वेद. पहिल्या अध्यायांतील पहिला मंत्र आहे. याचा प्रजापति परमेष्ठी, ऋषि आहे. सविता, देवता, स्वराड्बृहती व ब्राझुष्णिक्, ही छन्द आहेत. स्वर-मध्यम आणि ऋषभ; ह्या दोन सुरांत हा मंत्र म्हणावयाचा असतो. या वेदांत दुसरा एक विशेष दिसून येतो तो असा. दुसऱ्या वेदांचे स्वर कण्ठगत असतात किंवा ते मान हालवून दाखविले जातात. ह्या वेदाचे हस्तस्वर आहेत, म्हणजे शब्दांतील उदात्त, अनुदात्त किंवा स्वरित अक्षरें, हात उजवीडावीकडे वळवून ती दाखविली जातात. मंत्रांतील 'य', आणि 'घ' यांचा उच्चार अनुक्रमें ज, आणि ख असा करतात. उदाहरणार्थ:-- 'सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात्. ' हा मंत्रभाग सहस्रशीर्खा पुरुखः असा म्हणतात. यज्ञेन यज्ञमयजन्त देवाः' हा मंत्र 'जज्ञेन जज्ञमयजन्त' देवाः असा म्हणतात तथापि पोथींत, य, ष, अशीच अक्षरे लिहिलेली असतात. ज्या ठिकाणी 'य' चा 'ज' उच्चार करावयाचा असतो त्याठिकाणी 'चला' विशेष खूण केलेली असते. वाजसनेय शाखेच्या ब्राह्मणास 'शतपथ ब्राह्मग' म्हणतात. काण्व व माध्यदिन या दोन वाजसनेय शाखांचीच ब्राह्मण उपलब्ध आहेत. दोन्हींतहि १०० अध्याय आहेत. परंतु काण्व ब्राह्मणाचे १७ भाग केलेले आहेत, आणि माध्यंदिन ब्राह्मणाचे चवदा भाग आहेत. या भागांस 'कांड' अशी संज्ञा आहे. माध्यंदिन ब्राह्मणाच्या कांडांची नांवे व प्रत्येक कांडांतील