पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

F - - प्रस्थानभेद. वेळी श्रौतकर्मे जसजशी विस्तृत होत गेली, तसतशी या मंत्रांत अधिक भर पडत गेली आणि अठराचे २२ अध्याय या संहितेत ग्रथित करण्यांत आले, असें कांही आधुनिक विद्वानांचं मत आहे. - ऋग्वेद आणि कृष्णयजुर्वेद ह्यांत आलेल्या देवता शुक्लयजुर्वेदांत आल्या आहेत. त्याशिवाय आणखी अनेक देवता आहेत. देवतांच्या जोड्याहि अनेक आहेत. विद्वान् , प्राण, योगी, गृहपति, अन्तर्यामा ईश्वर, अग्न्यब्बृहस्पतयः सूर्यविद्वांसौ, प्रजासभ्यराजानः । इत्यादि अनेक देवता ह्या वेदांत अनेक ठिकाणी येतात. या वेदांतील ऋषिसंख्याहि पुष्कळ आहे. ऋग्वेदांतील ऋषी येथे आले आहेत हे प्रामुख्याने सांगण्याचे कारण नाही. कारण त्या वेदांतील ऋचा येथे यावयाच्याच, कृष्णयजुर्वेदाप्रमाणे होत्याचे मंत्र ऋग्वेदांतून घेतलेले असतात. छन्दःशास्त्रांत वर्णिलेली मुख्य सात वृत्तं गायित्रो, जगतो, त्रिष्टुभ, अनुष्टुम् इत्यादि वृत्ते व त्यांचे अनेक प्रस्तार व पोटभेद अशी नानाप्रकारची भिन्न नांवाची वृत्ते या वेदांत आली आहेत. शुक्लयजुर्वेदांत एक विशेष आढळून येतो. प्रत्येक मंत्राला एक ऋषि, देवता, आणि च्छन्दः ही असून त्याला सप्तसूरापैकी एक सूर असतो. षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत, आणि निषाद, या सप्तसुरांतील एका कोणत्या तरी सुरांत तो मंत्र म्हणावयाचा असतो. 'ईषेत्वोर्जेत्वा' इत्यादि हा - - -