पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुक्लयजुर्वेद. वाजसनेय संहितेचे ४० अध्याय आहेत, आणि त्यांत १९७६ कंडिका आहेत. तैत्तिरीय शाखेत आलेली कर्मे व तत्संबन्धी मंत्र हे ह्या संहितेच्या पहिल्या अठरा (१८) अध्यायांत आली आहेत.* २२-२५ अध्यायांत अश्वमेधमंत्र सांगितले आहेत. २६-३९ अध्यायांत तैत्तिरीय ब्राह्मणांतील विषय व अवान्तर कर्मे व अनुष्ठाने सांगितली आहेत. २६-३५ अध्याय हैं खिल आहेत, असें कात्यायनाचे मत आहे. २६-२९ अध्यायांत पूर्वी आलेल्या याज्ञिक कर्मासंबन्धाने अधिक मंत्र सांगेतले आहेत. चाळीसाव्या अध्यायांत याज्ञिककर्माविषयों एकहि मंत्र नसून तो अध्याय वेदान्तपर आहे. आत्मा व ब्रह्म, ह्या अध्यायाच्या देवता आहेत, म्हणजे यांच्याविषयी त्यांत विचार केला आहे. 'ईशावास्य' या नांवाचें जें उपनिषद आहे, तेच हा अध्याय होय. " ईशा वास्यमिदं सर्व यत्किंच जगत्यां जगत् " असा या अध्यायाचा आरंभ आहे. म्हणून या उपनिषदाला 'ईशावास्य' हे नाव पडले. मूळची ही संहिता आठरा अध्यायांचीच असावी, पुढे वेळो . *टीप:--ह्या विषयांची नांवे येणेप्रमाणे:--दर्शपौर्णिमास, पितृ. यज्ञ, आधानमंत्र, आग्निहोत्र, होम, होममंत्र, उपस्थानमंत्र, चातुमास्य, अग्निष्टोम, द्वादशाहमंत्र, गवामयनमंत्र, [३६० दिवस चालणारा ], प्रायश्चित्त त्र, वाजय, राजसय, चरकसौत्रामणी, आग्निचयन, शतन्द्रीय होम, चित्तिपरिषेक, या सर्वांचे मंत्र. येणेप्रमाणे मंत्र ह्या १८ अध्यायांत आले आहेत.