पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ प्रस्थानभेद. गोष्ट येथे सांगितली पाहिजे की दर्शपूर्णमास इष्टि, अग्निष्टोम अग्निचयन हीं जी यजनकर्मातील मूळ कर्मे, त्यांचे मंत्र व ब्राह्मण कृष्ण यजुर्वेदांत संकीर्ण केलेली नाहीत. ह्या कर्माचे मंत्र व ब्राह्मण अगदी पृथक् पृथक् आहेत. दर्शपूर्णमासेष्टि ह्या सर्व यजनकर्माची प्रकृति आहे. असे मानिले आहे. पुढे नवींनवी जी कर्मानुष्ठाने प्रचारांत आली ती सर्व ह्या प्रकृतिकर्माच्या विकृति होत. मूळ व प्रकृति कर्माविषयी व्यवस्था कृष्ण यजुर्वेदांत पद्धतवार आहे. शुक्ल म्हणजे शुद्ध मिश्रित नव्हे असा त्या शब्दाचा अर्थ आहे. याज्ञवल्क्याच्या वाजसनेय शाखेचे पंधरा भेद आहेत. चरणव्यूहांत सतरा नांवें दिलेली आहेत; ती येणेप्रमाणे. (१) जाबाला, (२) गौधया (बहुधेय ? ), इकाण्वा, ४ माध्यदिना, ५ शापाया. ६ तापनीय ७ कापाल ८ पौंड्रवत्सा, ९ आवटिका, १४ परमावटिका, ११ पाराशर्या १२ वैनेया, १३ वैधेय, १४ औधया. १५, गालवा, १६ वैजेया, आणि १७ कात्यायनीया. याप्रमाणे शुक्लयजुर्वेदाच्या शाखा होत्या. त्यापैकी माध्यंदिन आणि काण्व ह्या दोनच सध्या चालू आहेत. दोन्ही शाखांतील मंत्रक्रम, रचना, इत्यादिक व्यवस्था एकसारखी आहे. थोडे ठिकाणी पाठभेद आढळतो. शुक्लयजुर्वेदसंहितेस वाजसनेय संहिता म्हणतात. याज्ञवल्क्यानीं ती वाजीपासून ( सूर्यापासन ) घेतली म्हणून त्या संहितेस हे नांव प्राप्त झालें असें श्रीविष्णुपुराणांत सांगितले आहे. (अं. ३ अ. ५) -