पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुक्लयजुर्वेद. प्रवर्य व त्यांचा विधि हे त्या पक्ष्याचे खांदे होत. आठ काठक प्रश्न हे त्याचे पुच्छ होय आणि बाकी राहिलेली तीस कर्मे ही त्या पक्ष्याचा पिसारा आहेत. अशाच रीतीने यजुर्वेद हा वृक्ष आहे असें रूपक केलें आहे. उपनिषदाचे रहस्य हे ह्या वृक्षाचे मूळ होय. ऋचा ह्या त्यांची पाने; यजु ही त्यांची फुले व प्रवाल, आणि यज्ञकर्म हे त्या वृक्षाचे फल होय. विप्ररूपी भ्रमराने सेवित असा वृक्ष नेहमी असतो. शुक्लयजुर्वेद. कृष्णयजुर्वेदाची व्यवस्था संकीर्ण आहे. मंत्र व ब्राह्मण संहितेंतच आली आहेत आणि शिवाय ब्राह्मण निराळे आहे. ही गोष्ट वर सांगितली आहे. याज्ञिक कर्मे जसजशी वाढत गेली व त्यांचा विस्तार जसजसा फैलावला तसतशी ती कर्मे या वेदांत अन्तर्भून करण्यांत आल्यामुळे कृष्णयुजुर्वेदाचे असे हे स्वरूप झाले. ह्या स्वरूपांत बदल करून मळ व प्रधान याज्ञिक कर्माचे मंत्र व ब्राह्मण अगदी निरनिराळी करावीत असें याज्ञवल्क्यास वाटल्यावर त्याने शुक्ल यजुर्वेदाची नवी व्यवस्था केली. या व्यवस्थेनें संहितेंत केवळ मंत्रच ( ऋचा व यजु) आले आहेत, आणि ब्राह्मण हा ग्रन्थ अगदी वेगळा केला आहे. तथापि येवढी मात्र