पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० प्रस्थानभेद. तशी दे." आकाशवाणीने सांगितल्याप्रमाणे नचिकेता यमाच्या घरी गेला. यम बाहेर गेला होता. नचिकेता कांहीं एक न खातां, तीन रात्र तेथे राहिला. यम घरी आल्यावर त्याने नचिकेत्यास प्रश्न केले. यमःकिती दिवस ( रात्री) तूं येथे राहत आहेस. ? नचिकेताःतीन रात्री. यमः-पहिल्या रात्री तूं काय खाल्लेंस. ? नचिकेता तुझी प्रजा. यमः-दुसऱ्या रात्री काय खाल्लेस? नचिकेताः- - तुझे पशू. यमः-तिसन्या रात्री काय खाल्लेंस ? नचिकेताःतुझीं साधु कृत्ये. याप्रमाणे नचिकेत्यांची उत्तरें ऐकून यम . संतुष्ट झाला आणि वर माग ' असें तो नचिकेत्यास म्हणाला. न मरतां असा माझा जिवंत बाप मला मिळावा असा वर नचिकेत्याने मागितला. हा वर देऊन पुनः · दुसरा वर माग' असें यमाने सांगितल्यावरून त्याने माझ्या इष्टापूर्तीचा कधींहि क्षय होऊ नये असा वर मागितला. हा वर दिल्यावर तिसरा वर माग असें यम नचिकेत्यास म्हणाला. पुनमत्यु येऊ नये, मृत्यूचा पराजय करून टाकावा, मोक्षप्राप्ति व्हावी असा तिसरा वर नचिकेत्याने मागितला. तोहि यमाने त्यास दिला. नचिकेत अग्नीचें चयन व त्याची उपासना हीच त्यांची साधनें होत. __यजुर्वेद (तैत्तिरीयशाखा ) हा एक पक्षी आहे. शीक्षावल्ली, ब्रह्मवल्ली व भृगुवल्ली ही त्या पक्ष्याची तीन शिरें आहेत. प्रधान नऊ* कर्माचे विधि हा त्याचा आत्मा. ___*श्रीपः-पुरोडाशंः ऐष्टिक याजमानं, तद्विधिः दायब्राम्हणं, होतारः, तद्विधिः पुरोडाश विधिः दार्थ होत्रम्. पितृमेघहीं ती नऊ कम होत.