पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Ti यजुर्वेद. आलेली नाचिकेताची गोष्ट तै. ब्राह्मणांत आली आहे. (ब्रा. ३ प्र. ११ अ. ८ ) दोन्ही गोष्टींच्या तात्पर्यात फरक नाही. ब्राह्मणांत आलेली आख्यायिका अशी आहे. वाजश्रवस नांवाच्या मुनीने (गौतमपुत्र उद्दालक ) एकदा सर्वदक्षिणाक असा याग केला. यांत यजमानाजवळच्या सर्व संपत्तीची दक्षिणा द्यावयाची असते. याप्रमाणे वाजश्रवसाने आपले सर्वस्व देऊन टाकल्यावर ऋत्विज ते घेऊन जात असतां वाजश्रवसाचा नचिकता नांवाचा एक मुलगा होता त्याची या दानावर फार श्रद्धा बसली आणि आपणहि आपल्या बापाचे धनच आहोत, आपल्यास बापानें कोणाला तरी दिले, तर त्याच्या कर्माचें साफल्य होईल असें नचिकेत्यास वाटले. म्हणून तो बापाकडे गेला आणि म्हणाला “ बाबा ! तुम्ही मला कोणाप्रत देणार ! बापाने उत्तर न दिल्यामुळे नचिकेत्याने हाच प्रश्न पुनः पुनः तीनदां विचारला. वाजश्रवसाला राग आला, आणि तुला मी यमाला देऊन टाकतों, असें नचिकेत्यास म्हणाला. या वेळी आकाशवाणी होऊन ती नचिकेत्यास म्हणाली, “हे गौतमकुमारा तुझ्या बापाने तुला यमास दिले आहे; तूं आतां त्याच्या घरी जा, असें तुझा बाप सांगतो आहे. मी तुला सांगते त्याप्रमाणे तूं आतां कर. यम बाहेर प्रवासास गेला असेल अशा वेळी तूं त्याच्या घरी जा. कांहीं एक न खातापितां तूं तेथें तीन रात्रीं रहा. यम परत घरीं आल्यावर तो तुला प्रश्न करील त्यांची उत्तरें मी सागतें