पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. वाटून आनन्द हेच ब्रह्म, असें त्यास विचारान्तीं प्रतीत झाले. हीच भृगला घरुणानी दिलेली विद्या, हिची समाप्ति परब्रह्मांत होते. (सैषा भार्गवी वारुणी विद्या ॥ परमे व्योमन् प्रतिष्ठिता ॥), ब्रह्मज्ञान झालेल्या मनुप्यास ब्रह्मप्रतिष्ठा प्राप्त होते. पुढे अन्नादिकांचे महत्त्व वर्णन करून चित्ताची एकाग्रता हे तप परम पुरुषार्थाचें साधक आहे, असे सांगितले आहे. ब्रह्मज्ञानी ह्या जगांत जोपर्यंत असतो तोपर्यंत त्याला जीवन्मुक्त ह्मणतात, ब्रह्मानन्दांत तल्लीन होऊन ह्या जगांत कामान्नी, आणि कामरूपी होऊन अन्न, आणि अन्नाद मीच आहे असे सामगान करीत तो हिंडत असतो. ___ कृष्ण यजुर्वेदांतील कठ आणि मैत्रायणीय ( कलाप ) शाखा आज मित्तीस उत्तर हिंदुस्थानांत चालू आहेत. असें वर सांगितले आहे. त्या शाखांचें ब्राह्मण निराळे नाही त्यांतील गद्यात्मक ग्रन्थ हाच त्यांचे ब्राह्मण होय. मैत्रायणीयाचे चौथ्या कांडांत त्यांचे ब्राह्मण आहे. त्याची चारच कांडे असून त्यांत ५४ प्रपाठक आहेत. कठ संहिता बहुतेक मैत्रायणीयासारखी आहे. तैत्तिरीय ब्राह्मणाचे तिसरे कांडांतील शेवटचे तीन प्रश्न आणि आरण्यकाची पहिली दोन प्रपाठकें ही कठ शाखेतील आहेत. म्हणून त्यास काठक असे म्हणतात, असें वर सांगितले आहे. काठकोपनिषद् , मैत्रायणीयोपनिषद् आणि श्वेताश्वेतरोपनिषद् हे तीन ग्रंथ या शाखांचे आहेत. काठकोपनिषदांत