पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यजुर्वेद. सांगून ब्रह्मानन्दी मनुप्यास बरे वाईट केल्याबद्दल अनुताप होत नाही, असे सांगितले आहे. या उपनिषदांस ब्रह्मविदा असेंहि म्हणतात. ___ भृगुवल्ली नवव्या प्रपाठकांत आहे. त्याचे दहा अनुवाक आहेत. साहिती उपनिषदांत बहिरंगसाधने सांगितली आहेत. ह्या उपनिषदांत अन्तरंगसाधनांचा विचार केला आहे. मनांत सतत ब्रह्मविचार चालला, तर अन्नमयादि कोशांत हळूहळू आणि क्रमाने कसा प्रवेश होतो आणि शेवटी ब्रह्मस्वरूप कसे कळते, हे स्पष्ट रीतीने येथे दाखविलें आहे. वरुणाचा मुलगा भृगुऋषी आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, 'भगवन् मला ब्रह्म काय आहे हे शिकवा. " ब्रह्मविद्येची द्वारे पहिल्यांदा समजावीत म्हणूनच वरुणांनी आपल्या मुलास अन्न, प्राण, चक्षु, श्रोत्र, मन, आणि वाणी हीच ब्रह्म आहेत असे सांगून ही सर्व भूतें ज्यापासून उत्पन्न झाली, ज्याच्यामुळे जगतात, नाश पावतात आणि ज्यामध्ये ती भूतें शेवटी प्रवेश करतात, असें जें कांहीं आहे, तेंच ब्रह्म होय, असे समजून घेण्याची इच्छा कर, असें त्यांनी भृगूस सांगितले. भृगूनें तप केलें, तप केल्यावर अन्न हेच ब्रह्म आहे असे त्यास वाटलें, कारण अन्नापासून सर्व कांहीं उत्पन्न होते, वांचतें आणि नष्ट होते. पुढे बापाच्या आज्ञेवरून भगूनें तप केले ( विचार करूं लागला) प्राण, मन आणि विज्ञान हेच ब्रह्म आहे अशी अनुक्रमाने त्याची खात्री होत गेली. शेवटीं विज्ञान हे सुद्धां ब्रह्म नाही असे