पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. यांचे उत्तर तेथे दिले आहे. पुढे ब्रह्माला आपण पुष्कळ व्हावे आणि प्रजा उत्पन्न करावी, (बहुस्यां प्रजायेय इत्यादि) अशी इच्छा झाली. त्याप्रमाणे त्यानें तप करून सर्व सृष्टि निर्माण केली आणि त्यांत आपण प्रवेश केला. प्रवेश केल्यावर सत्य व अनृत, मूर्त व अमूर्त इत्यादि रूपें त्याने धारण केली. हे में सर्व जगत् आहे, तें वस्तुतः सत्य म्हणजे ब्रह्मच आहे. ७ ( सातव्या अनुवाकांत), पूर्वी हे सर्व जगत् अव्यक्त होते, म्हणजे नामरूपांनी समजण्यासारखे नव्हते. ब्रह्माने स्वतः आपल्यासच ते जगत् करून घेऊन तें व्यक्त केले. ते ब्रह्म सुकृत आहे, रस आहे. हा ब्रह्मरूपी रस ज्याला मिळतो तोच आनन्दी होय. हे ब्रह्म नसते तर जगांतील सर्व चराचर वस्तूंत क्रियादि करण्याचे जे सामर्थ्य आहे, किंवा जी प्राणशाक्त आहे, त्या त्यांत कशा आल्या असत्या ? अशा प्रकारचे ब्रह्म ज्याला समजले आहे, त्याला संसाराची भीति नाही. अज्ञानांना संसाराची भीति असते. ८ (आठव्या अनुवाकांत), वायु; सूर्य, अग्नि इन्द्र मृत्यु इत्यादि सर्व देवता आपापली कामें ह्याच्या भीतीनेंच बरोबर करतात. ह्याप्रमाणे ब्रह्मानंदाची मीमांसा ह्या उपनिषदांत केली आहे. हा आनंद सर्व देवांच्या आनंदाहून शतपटीने मोठा आहे. ही गोष्ट येथे निर्दिष्ट केली आहे. ब्रह्मनन्दाचा अनुभव प्राप्त झालेला मनुष्य ह्या लोकांतून गेल्यावर अन्नमय, प्राणमय इत्यादि आत्म्यांतून जाऊन आनन्दमय आत्म्यांत उपसंक्रमण करतो. ९ (नवव्या अनुवाकांत) यतो वाचो निवर्तन्ते इत्यादि