पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यजुर्वेद. असा ब्रह्मानन्द ज्याला ठाऊक आहे त्याला कधीहि भीति वाटत नाही. ह्या मनोमय आत्म्याहून निराळा असा विज्ञानमय आत्मा आहे. त्याची प्रशंसा आहे. ५ (पांचव्या अनुवाकांत ) विज्ञानाच्या योगाने यज्ञादि श्रौत आणि व्यावहारिक कर्मे होतात. त्या विज्ञानाची उपासना, तें ब्रह्म ज्येष्ठ आहे. असे समजून सर्व देव करतात. ह्या विज्ञानमयाहून निराळा असा आनन्दमय अंतरात्मा आहे. त्याची प्रशंसा केली आहे. अन्नमय इत्यादि जे हे पांच आत्मकोश वर्णिले आहेत, त्यांची स्वरूपं श्येन पक्ष्याच्यारूपकानें वर्णिली आहेत. उदाहरणार्थ ह्या आनन्दमय आत्म्याचे प्रिय हे शिर आहे. मोद हा उजवें पंख, प्रमोद डावें पंख, आनन्द हे शरीर ( आत्मा ) आणि ब्रह्म हेच पुच्छ व प्रतिष्ठा अशा प्रकाराने त्यांची प्रशंसा (श्लोक ) केलेली असते. ६ ( सहाव्या अनुवाकांत ) पूर्वीच्या अनुवाकांत अन्नमय आत्म्यापासून ( पुरुषापासन ) आनन्दमय आत्म्यापर्यंत एकाहून एक अधिक अशी व्यवस्था सांगितली आहे, आणि सर्वांची प्रतिष्ठा ब्रह्म आहे, असे दाखविले आहे. असे हे ब्रह्म नाहींच असें म्हणणारा मनुष्य असत् आहे असे समजावें. असें ब्रह्म आहे, असे म्हणणारा सत् म्हणजे ज्ञानवान आहे, असे समजावें. याप्रमाणे ब्रह्माविषयीं गुरूनी उपदेश केल्यावर शिष्यास शंका येऊन विद्वान् व अविद्वान् मनुप्य मेल्यावर ब्रह्माकडे जाईल किंवा नाही व ब्रह्मानन्द त्यास मिळेल किंवा कसे! असे प्रश्न त्याने केले आहेत. - - -