पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. निषद म्हणतात. कारण त्यांचा संप्रदायप्रवर्तक वरुण आहे. दोहोंमध्येहि ब्रह्मविद्येचे प्रतिपादन आहे. ह्य उपनिषद्वयांची महती फार आहे. सर्व उपनिषदांचे हे उपनिषद्वय शिरोमणीच मानिले आहे. आठव्या अध्यायांत नऊ अनुवाक आहेत. पहिल्या अनुवाकांत गुरुशिष्यांची प्रार्थना आणि शांति आहेत. दुसऱ्या अनुवाकांत 'ब्रह्मविदाप्नोतिपरं । हे जे सर्व उपनिषदांचे तात्पर्य ते पहिल्याप्रथमच सांगितले आहे. ब्रह्म जाणणारास परब्रह्म मिळतें. हे सांगून ‘सत्यज्ञानमनन्तं ब्रह्म ' हे ब्रह्माचे लक्षण दिले आहे नंतर ह्या ब्रह्मापासून आकाश-वायु-अग्नि-पाणी-पृथ्वी-अन्न-रतअन्न-अन्नापासून अन्नरसमय पुरुष अशा रीतीने उत्पत्तिक्रम सांगितला आहे, आणि ह्या पुरुषाची प्रशंसा केली आहे. अन्नापासून सर्व प्रजा उत्पन्न होतात, जगतात इत्यादि; अन्न हे ज्येष्ठ आहे, ह्या अन्नरूपी ब्रह्माची उपासना करतात. अन्नरसमय पुरुषाहून (आत्म्याहून) निराळा प्राणमय असा अन्तरात्मा आहे. या प्राणमयाची प्रशंसा केली आहे. ३ (तिसऱ्या अनुवाकांत.) प्राण हा देव, मनुष्य आणि सर्व भूतें यांत असतो. तो त्यांचे आयुष्यच आहे. प्राण हेच ब्रह्म होय. प्राणमयाची स्तुति केली आहे. त्या प्राणमय आत्म्याहून मनोमय शारीर आत्मा निराळाच आहे. ४ (चवल्या अनुवाकांत ) ब्रह्मानन्दाचे वर्णन वाणीला करता येत नाही. मनाला त्याची कल्पना होत नाही. ही दोन्ही ब्रह्मापासून परत फिरतात ( यतो वाचो निवर्तन्ते....)