पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३३. यजुर्वेद. वाक्ये ) यांचा अभ्यास करण्यास सांगितले आहे. तिसऱ्या अनुवाकांत सहितेचे उपनिषत् सांगितले आहे. अधिलोक, अधिज्योतिष, अधिविद्य, अधिप्रज, आणि अध्यात्म हे पांच ज्ञानाचे विषय आहेत, ते समजून घ्यावे. चवथ्या अनुवाकांत मेधा आणि श्री प्राप्त करून घेण्याची इच्छा करणाऱ्यांनी म्हणावयाचे मंत्र सांगितले आहेत. पांचव्या आणि सहाव्या अनुवाकांत ब्रह्मोपासनेचे मंत्र आहेत. व्याहृती वगैरे सांगून ब्रह्माचे मनोगोचर गुण वर्णिले आहेत. सातव्या अनुवाकांत पृथ्वी इत्यादि महाभूतांच्या स्वरूपानें ब्रह्माचे वर्णन आहे. आठव्या अनुवाकांत ॐ शब्दानें अभिधेयब्रह्माची उपा- . सना सांगितली आहे. नवव्या अनुवाकांत ब्रह्मोपासनेसहवर्तमान श्रौतस्मार्त नित्य कर्माची उपासना करावी असे सांगितले आहे. दहाव्यांत ब्रह्मयज्ञाचे वेळी म्हणावयाच मंत्र सांगितला आहे. वेदांचा पाठ न झाल्यास 'अहंवृक्षस्यरेरिवा' इत्यादि मंत्र तरी म्हणावा, असे निर्दिष्ट केलें आहे. अकराव्या अनुवाकांत गुरूंनी वेदाचें अध्यापन केल्यावर शिष्यास जगांत कसे वागावे हा उपदेश केला आहे. ह्या उपदेशांत सांगितलेले आचरणाचे नियम सध्यांच्या कोणत्याहि समाजस्थितींतील लोकांस अग्राह्य होणार नाहीत. हेच उपास्य आहे असे शेवटी सांगितले आहे. बाराव्या अनुवाकांत कृतज्ञतादर्शक शांतीचे मंत्र आहेत. आठव्या आणि नवव्या प्रपाठकांत अनुक्रमें ब्रह्मवल्ली व भृगुवल्ली ही दोन उपनिषदें आहेत. यांस वारुणी उप