पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. आहेत हे वर सांगितलेच आहे. त्यांची नांवेंहि दिली आहेत. कालपरत्वे सद्यःपरिस्थति इतकी बदलली आहे की त्या नांवांवरून किंवा त्याविषयी थोडीबहुत माहिती दिली तरी याज्ञिक कर्माची नीटशी कल्पना सद्यःकालीन आपल्या गृहस्थ ब्राह्मण लोकांस कितीशी येईल याबद्दल शंका वाटते. तैत्तिरीय ब्राह्मण, तैत्तिरीय संहितेच्या वेळीच ग्रथित झाले असावे. त्याची भाषा संहितेच्या भाषेसारखी आहे,आणि तें सर्व स्वरित आहे. या दोन कारणांवरून तैत्तिरीय ब्राह्मण सर्व ब्राह्मणांहून प्राचीन ग्रन्थ असावा. आरण्यकांत तैत्तिरीय उपनिषद आहे (प्र. ७-९ ) यांत शिक्षा, ब्रह्मविदा, आणि भृगु ह्या तीन वल्ली आहेत. महानारायण हे उपनिषद दहव्या प्रपाठकांत आहे. सहवै (प्र.२) आणि चित्ति (प्र. ३) हे दोन प्रपाठक उपनिषदेंच आहेत असे समजतात. तैत्तिरीय आरण्यकाचे सातव्या प्रपाठकांत शिक्षावल्ली उपनिषद आहे. या उपनिषदाला सांहिती उपनिषद म्हणतात. कारण त्यांत संहिता आली आहे. ह्या प्रपाठकाचे बारा अनुवाक आहेत. पहिल्या अनुवाकांत शंनोमित्र, इत्यादि प्रार्थना आहे. दुसऱ्या अनुवाकांत, वर्ण, उदात्तादिस्वर, हस्वदीर्घादि मात्रा, बल म्हणजे प्रयत्न ( स्पृष्ट, इषत्स्पृष्ट इत्यादि जे व्यंजनाचे भेद आहेत ते ) साम (वर्ण किंवा शब्द उच्चारण्यास बरोबर लागणारा वेळ, )आणि संतान(सहिता, -