पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यजुर्वेद. ऋग्वेदांत आलेले सर्व देव या वेदांत येतात. परंतु विशेषतः अग्नि, प्रजापति, ब्रह्मा, बृहस्पति, सूर्य, वायु, चन्द्रमा, इन्द्र, यम, वरुण, सोम, वैश्रवण, वसु, रुद्र, आदित्य इत्यादि देवांच्या संबन्धीं यजन कर्मे बरीच आहेत. अग्निस्थापना करण्याचे वेळी प्रत्येक वर्णाचे मनुष्याने आपापल्या दैवताचे व्रत आचारण करून अग्नीचे आधान करावे असे सांगितले आहे. (तै ब्रा. १.१.४ ). असे केले असतां, तो मनुष्य धनवान् होतो. ब्राह्मणांची ' आदित्य' देवता आहे. राजाची वरुण देवता, राजन्यांची इंद्रदेवता, याप्रमाणे निरनिराळ्या वर्णीच्या निरनिराळ्या देवता सांगितल्या आहेत. असे सांगण्याचे कारण असे दिसते, की, त्यावेळी देवगणांत सुद्धा वर्णभेद आहे, अशी समजूत झाली होती. अग्नि, प्रजापति, बृहस्पति, आदित्य हे ब्राह्मणदेव आहेत, असें मानिले जात असे. इंद्र, वरुण, सोम, यम आणि वैश्रवण ( कुबेर ) हे क्षत्रिय असावेत. पुष्कळ ठिकाणी ह्या देवांना 'राजा' हे विशेषण लावलेले आढळतें. तैत्तिरीय संहिता आणि ब्राह्मण ही ज्या काली दुसन्या वेदापासून निराळी झाली, त्या कालाला अनुसरून व त्या वेळी सोपे व सोईस्कर होईल अशा रीतीनेच त्यांतील विषयांचा अनुक्रम ठरविला असावा. यामुळे कांडाकांडास अनुसरून कोणताहि विषय पूर्णपणे सांगता येणार नाही. दोन चार प्रधान कर्माची सविस्तर माहिती येथे देणे स्थलसंकोचामुळे अशक्य आहे. तथापि ह्या वेदांत किती विषय आले