पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. पांचव्या प्रपाठकांत प्रवग्य व त्यासंबंधीं ब्राह्मण आली आहेत. प्रवर्य हा एक प्रकारचा यज्ञच आहे. ६ सहाव्या प्रपाठकांत और्ध्वदेहिक कर्मापैकी प्रेतदहनाचे मंत्र सांगून पितृमेधाचे मंत्र सांगितले आहेत. येथे कर्मकांड संपलें. पुढे ७-९ प्रपाठकांत तैत्तिरीय उपनिषद आहे. ह्याविषयी थोडीशी माहिती पुढे दिली आहे. १० प्रपाठकांत — महानारायण ' उपनिपद आले आहे. कृष्णयजुर्वेदी ब्राह्मणांच्या आन्हिक कमीपैकी संध्या, वैश्वदेव, त्रिसुपर्ण इत्यादि अनेक कर्मातील मंत्र ह्या प्रपाठकांत आले आहेत. काठकें आठ आहेत, असें वर सांगितलेच आहे. ब्राह्मणाच्या तिसऱ्या कांडांतील १०-११-१२ प्रपाठकांत आणि आरण्यकाच्या १-२ प्रपाठकांत (प्रश्नांत) ती काठकें आहेत. त्यांची नांवे येणेप्रमाणे:-सावित्र (ब्रा. कां. ३, प्र. १०), नाचिकेत (ब्रा. कां. ३ प्र. ११ चातुर्होत्र (ब्रा. कां. ३, प्र. १२ अ. ५), वैश्वसृक (ब्रा. कां. ३, प्र. १२ अ. ६-९), दिवःश्येनयोपमा (ब्रा. कां. ३, प्र. १२, अ. १-२), आपाद्येष्टी (ब्रा. कां. ३, प्र. १२, अ. ३-४), आरुण ( आ. प्र. १), आणि स्वाध्याय ( आ. प्र. २) अशी ही आठ काठककांडे आहेत. यांत अग्निचयनाचा विशेषतः विचार केला आहे. ही कठ शाखेतून घेतली असावीत म्हणून त्यास काठक म्हणतात.