पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९ यजुर्वेद. दाशिक या तिन्हींचे तीन विधि आणि पितृमेध अशा नऊ कांडांचा प्रजापति ऋषि आहे, असे तद्विद लोक मानतात. अधर, ग्रह, दाक्षिण, त्यांचा विधि, वाजपेय, त्याचा विधि, प्रवर्य, तद्विधि, आणि सब, अशा नऊ कांडांचा सोम हा ऋषि आहे. अग्न्याधेय, अग्न्युपस्थान, अग्नि, त्याचे दोन विधेि, आणि अग्निहोत्राचा विधि, ह्या सात कांडांचा आग्न, कांडऋषि आहे. राजसूय, काम्यपशू , इष्टी, उषानुवाक्या, याज्या, राजसूयविधि, सत्रायण, अश्वमेध, उपहोम, कोकिली, सौत्रामणी, नक्षत्रीष्टि, नरमेध, पाशुक हौत्र, अच्छिद्रकांड आणि अश्वमेधविधि ह्या बाको राहिलेल्या सोळा कर्माचे ऋषि विश्वेदेव आहेत, असें मानिले आहे. आरण्यकाच्या दहा प्रपाठकांपैकी पहिल्यांत आरुणकेतुक अग्नीचो चिति, व त्याच्या कुंडाच्या इष्टिकांचे ( विटांच्या ) स्थापनेचे मंत्र सांगितले आहेत. अरुण आणि केतु या मुनींनी ह्या अग्नीचें चयन पहिल्यांदा केले म्हणून त्याला आरुणकेतुक असे म्हणतात. वातरशना मुनीनेही या अग्नीचें चयन केले होते. २ दुसऱ्या प्रपाठकांत स्वाध्याय सांगितला आहे. त्यांत त्या वेळच्या संध्येचे मंत्र व कुष्मांड होम, त्या होमाचे मंत्र, दीक्षा, विधान, हे विषय आले आहेत. याशिवाय देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुप्ययज्ञ, आणि विशेषतः ब्रह्मयज्ञ ह्या पंचमहायज्ञांची हकीकत आहे. ३ तिस-या प्रपाठकांत चातुर्होत्रमंत्र, पुरुषसूक्त, उत्तरनारायण, मृत्युसूक्त, वगैरे विषय आहेत. ४-५ चवथ्या व