पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- - - । प्रस्थानमैदः आहेत. आग्नेय हा उखाचा शिष्य होता. आत्रेयाने ह्यो वेदाचीं पदें केली. कौण्डिणेयाची या वेदावर वृत्ति आहे. बौधायन, आपस्तंभ, सत्याषाढ, हिरण्यकेशी हे मुख्य सूत्रकार होत. . सैत्तिरीयसंहितेचे मुख्य सात भाग केलेले आहेत. प्रत्येक भागास ' कांड ' हे नांव आहे. प्रत्येक कांडांत प्रश्न किंवा प्रपाठक असतात, आणि प्रपाठकांच्या पोटांत अनुवाक असतात. प्रत्येक अनुवाकांत विशिष्ट कर्माविषयीं मंत्र किंवा ब्राह्मण असतात. ह्या संहितेची सात कांडे आहेत. एकंदर प्रपाठक ४४ आहेत, अनुवाक ६५१ आहेत आणि पदसंख्या १,१०,२९३ आहे. तै० ब्राह्मणांत ३ कांडे, २८ प्रपाठक आणि ३३९ अनुवाक आहेत. आरण्यकांत १० प्रपाठक आणि त्यांचे पोटांत अनुवाक आहेत. तैत्तिरीय शाखेत कर्म व ज्ञान या विषयासंबंधी दोन्ही मिळून एकंदर ५२ प्रकरणे सांगितली आहेत. अर्थातू प्रत्येक कर्मास लागणारे मंत्र, त्यांचा प्रयोग व त्याची सर्व तंत्रे यांचा विचार या प्रकरणांत केलेला असतो. या प्रत्येक प्रकरणांस ' कांड' ही पारिभाषिक संज्ञा आहे. या ५२ कांडांपैकी ४१ शाखाकांडे (कर्मकांडे ) होत. तीन उप निषद् किंवा वेदान्त कांडे आहेत आणि आठ काठकें आहेत. प्रत्येक कांडाचा एक ऋषि असतो. शाखाकांडांचे प्रजापति, सोम, अग्नि आणि विश्वेदेव असे चार कांडऋषि आहेत. शाखादि (पुरोडाशिय ) याजमान, होत, हौत्र