पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यजुर्वेद. सांगितले आहे.* कठसंहिता पंजाब व काश्मीर या देशांत यजुःशाखीय ब्राह्मण म्हणतात. कपिष्ठल संहिता नाहीशी झाली. मैत्रायणिसंहिता गुजराथ, मौर्वी आणि नर्मदानदीचे आजूबाजूचे प्रदेशांत पठन करितात. तैत्तिरीयसंहिता दक्षिण हिंदुस्थानांत आहे. बाकीच्या नष्ट झाल्या, किंवा अजून त्यांचा पत्ता लागला नाही. वैशंपायनानें तैत्तिरीयसंहिता पैंगि यास्कास, यास्काने तित्तिरीस, आणि तित्तिरीने उखास शिकविली. औख्य आणि खांडिकेय असे तैत्तिरीयसंहितेचे दोन भेद आहेत. बौधायनी, आपस्तंभी, सत्याषाढी, हिरण्यकेशी आणि औधेयी, असे पांच पोटभाग खांडिकेयाचे

  • टीप:- चरणव्यूहांत कृष्ण यजुर्वेदाच्या ८६ शाखा आहेत असे सांगितले आहे. परंतु त्या ग्रन्थांत त्यांची नांवे दिलेली नाहीत. चरकाचे बारा भेद सांगितले आहेत. चरक, आव्हरक, कठ, प्राच्यकठ कपिष्ठिलकठ, रायणीय, वारायणीय, वार्तान्तवेय, श्वेत, तसर, मैत्रायणीय आणि औपमन्यव. मैत्रायणीच्या सात शाखा सांगीतल्या आहेत, त्या येणेप्रमाणे:-मानव, दुंदुभ, ऐकेय. वाराह, हारिद्रवेय, श्यामआणि श्यामायनीय-कठाचे तेराभेद आहेत म्हणून ऐकतों, परंतु त्यांची ना माहित नाहीत. तैत्तिरीय शाखेतील खांडिकेयाचे पांच भेद आणि आँखेय शाखा ह्या एकंदर सहा आहेत. या सर्वांची बेरीज केली तर एकंदर ३८ शाखा होतात. बाकीच्या कोठे आहेत किंवा होत्या हे समजण्याचा मार्ग उरला नाही. ह्याच वेदाच्या इतक्या शाखा कां व्हाव्यात, हे कळत नाही. उपलब्ध असलेल्या संहिता व ब्राम्हण ग्रन्थां, त म्हणण्यासारखा पाठभेद दिसून येत नाही. विशिष्टकर्मात मंत्राच्या विनियोगासंबंधाने किंवा प्रयोगाविषयी अनेक ऋषींचा मतभेद होऊन अनेक शाखा होण्याचा संभव आहे. ह्या वेदाच्या वैशंपायनाने २७ शाखा केल्या, असे श्रीविष्णुपुरणांत सांगितले आहे. (अंश ३ अध्याय ५.)