पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. मंत्र यजुः नाहीत. त्यांत होत्याने म्हणावयाचे मंत्रयाज्या व पुरोनुवाक्या-यांच्या ऋचा आल्या आहेत. तसेंच उद्गात्याचे साममंत्रहि आले आहेत. तथापि यजूंची संख्या या वेदांत अधिक असल्यामुळे या वेदास यजुर्वेद म्हणतात. वेदांचे कर्मकांड व ज्ञानकांड असे दोन भाग असतात. या वेदाचे कर्मकाण्डांत नित्य, नैमित्तिक, काम्य आणि निषिद्ध अशा चार कर्मीचे प्रतिपादन केले आहे. या कर्माचे दोन भाग केले आहेत. प्रकृति आणि विकृति. प्रत्येक कर्माची काही तरी अंगे असतातच. ज्यांत कर्माच्या सर्व अंगांचा उपदेश केला असतो, म्हणजे प्रत्येक अंग सांगून तें कसे करावें, इत्यादि सर्व माहिती जेथे दिली असते, त्याला प्रकृति म्हणतात. कर्माच्या प्रधानअंगांचेच तेवढे वर्णन करून बाकीच्या अंगांविषयी जेथें अतिदेश केला असतो, त्यास विकृति हे नांव आहे. दुसऱ्या एखाद्या कर्मात ती अंगें कशी करावीत हे सांगितले असते, तशीच प्रस्तुत कर्मात ती करावीत असे सांगणे, यास अतिदेश म्हणतात. अग्निहोत्र, इष्टि आणि सोम हे प्रकृतीचे तीन प्रकार आहेत. या तिन्ही प्रकारांत दुसऱ्या कर्माची अपेक्षा न धरतां त्या कर्मीच्या सर्व अंगांचा पूर्ण उपदेश केला असतो, म्हणजे त्यांच्या सर्व अंगांचे इत्थंभूत वर्णन केलें असते. या तीन जातींच्या काव्यातरिक्त कर्मै विकृति होत. कारण त्यांच्या काही अंगांचा अतिदेश केला असतो. कृष्णयजुर्वेदाचे ८६ भेद आहेत असें चरणव्यूह ग्रंथांत