पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यजुर्वेद. यजुर्वेदाचे दोन तट किंवा पक्ष झाले.. ते कसे, केव्हां व कां म्हणून झाले, याविषयी निश्चित अशी काही एक माहिती नाही. परंतु त्याविषयीं एक दंतकथा परंपरेनें आली आहे ती अशी*:--वेदव्यासांनी वेदाचे चार भाग केल्यावर यजुर्वेदाचा उपदेश वैशंपायनास केला. वैशंपायनाने याज्ञवल्क्यादि शिष्यांकडून त्याचे अध्ययन करविले. काही कारणानें वैशंपायन याज्ञवल्क्यावर रागावले, आणि ' माझ्याजवळून शिकलेला वेद मला परत दे' असें ते याज्ञवल्क्यांस म्हणाले. यावर याज्ञवल्क्याने वेद ओकून टाकला. तो वैशंपायनाच्या शिष्यांनी त्यांच्या आज्ञेवरून तित्तिरिपक्ष्याचे रूप धारण करून खाऊन टाकला. ओकून टाकलेला वेद रखरखित निखाऱ्यासारखा होता. तित्तिरपक्षी निखारे खातात म्हणून वैशंपायन शिष्यांनी तित्तिरिपक्षी होऊन तो वेद ग्रहण केला. याज्ञवल्क्याने पुढे सूर्याची उपासना करून त्यापासून यजुः पुनः शिकून घेतले. यांस शुक्ल यजुर्वेद म्हणतात. कृष्ण यजुर्वेदाच्या संहितेंत मंत्र व ब्राह्मण मिश्रित आहेत, आणि याशिवाय ब्राह्मण आणखी निराळे आहे. शुक्ल यजुर्वेदांत संहितेंत सर्व मंत्रच आहेत. आणि त्याचें ब्राह्मण अगदी वेगळे केले आहे. हा भेद ह्या दोन वेदांत आहे. शिवाय मंत्रांत पाठभेद व क्रमभेद ही आढळून येतात. यजुर्वेदांत सगळे

  • श्रीविष्णुपुराणांत ही गोष्ट आली आहे, तिचा सारांश असाच आहे. ( वि. पु. अ० ३ अ० ५.)

- -