पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद. यज्ञस्य पुरोहितम्. पुरोहितं यज्ञस्य देवम्, देवम् यज्ञस्य पुरोहितम्, पुरोहितं यज्ञस्य देवम्. इत्यादि. वस्तुस्थिति आतां पुष्कळ बदलली आहे. घोकंपट्टीची आतां अगदी जरूरी राहिली नाही. कोणी अशी घोकंपट्टी करूं लागला तर व्यर्थ श्रम करीत आहे असे म्हणून त्यास लोक हसतील. तथापि ह्या घोकंपट्टीच्याच साहाय्याने आजपर्यंत सर्व वेदग्रन्थाचा बचाव झाला आहे. पुढे वेदांगांत छंदःशास्त्रांत जी मुख्य छन्द ( वृत्ते ) सांगितली आहेत, ती बहुतेक सर्व ऋग्वेदांत आली आहेत. __तथापि त्रिष्टुम् आणि गायित्री या वृत्तांचा भरणा सर्वात अधिक आहे. चार हजारांहून अधिक मंत्र त्रिष्टुभ् छन्दांत आहेत. गायित्रीमंत्र सुमारे २४५० आहेत. यजुर्वेद. यजुर्वेद हा ' अध्वर्यु ' ऋत्विजाचा वेद आहे. यजन कर्माची सर्व तयारी करणे, त्याची तंत्राप्रमाणे व्यवस्था लावणे व तत्संबधी मंत्र म्हणणे, आहुति देणे, इत्यादि कामें अवयंची आहेत. ह्या कर्मासंबन्धी सर्व मंत्र व ब्राह्मण या वेदांत संकलित केली आहेत. त्याचप्रमाणे यजमान व त्याची कर्मे आणि त्या संबन्धी मंत्रादि या वेदांत सांगितले आहेत. यजुः या शब्दाचा सामान्यतः अर्थ, गद्यात्मक मंत्र असा करतात. यजुः हे छन्दोबद्ध नसते.