पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पदक्रमादि पाठांची अध्ययनपरिपाठि अबाधित राहिच्यामुळे सर्व वेद होते तसेच आजपर्यंत राहिले, असें हटलें असतां कोणी हरकत घेणार नाही. क्रम, जटा व वन म्हणण्याचा परिपाठ उत्तरोत्तर कमी होणारच. आतां. पद्धां फार थोडे घनपाठी वैदिक आढळतात. यासाठी हे पाठ कसे असतात, याविषयी थोडीबहुत कल्पना यावी, म्हणून पहिल्या ऋचेचे क्रम जटा व घन पाठ पुढे दिले आहेत. ___ अग्निमीळे पुरोहितम् यज्ञस्य, देवमृत्विजम् होतारं रत्नधातमम् ॥ पदेः-...अग्निम्, इळे, पुरोहितम् , यज्ञस्य, देवम्, ऋत्विजम् , होतारम् , रत्नधातमम् ॥ क्रमः-----अग्निमीळे, ईळे पुरोहितम्, पुरोहितम् यज्ञस्य, यज्ञस्य देवम्, देवमृत्विजम् इत्यादि इत्यादि. जटा:-----अग्निमीळे, ईळेऽग्निम्, अग्निमीळे; इळेपुरोहितम् पुरोहितमीळे, ईळे पुरो हितम्, पुरोहितम् यज्ञस्य, यज्ञस्य पुरोहितम्, पुरोहितम् यज्ञस्य; यज्ञस्य देवम्, देवम् यज्ञस्य, यज्ञस्य देवम्; इत्यादि इत्यादि. धनः-अग्निमीळे, ईळेऽग्निम्; अग्निमाळे पुरोहि तम्; पुरोहितमीळेऽग्निम्, अग्निमीळपुरोहितम्. इळेपुरोहितम्, पुरोहितमीळे, ईळेपुरोहितम् यज्ञस्य, यज्ञस्य पुरोहितमीळे, ईळेपुरोहितम् यज्ञस्य. पुरोहितं यज्ञस्य: