पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ प्रस्थानभेद. साभिधेनीऋचा सांगितल्या आहेत. पहिल्या आरण्यकांत महाव्रताचेंच प्रतिपादन आहे. तें अपौरुषेय ब्राह्मण आहे. पांचव्या भागांतील ग्रन्थ ऋषिप्रणीत व सूत्रात्मक आहे. म्हणून एक विषय दोनदा आला असा पुनरुक्त दोष येथे होत नाही. कौषितकी ब्राह्मणाचे कौषितकी आरण्यक आहे. याचे पंधरा अध्याय आहेत. पहिल्या दोन अध्यायांत महाव्रतासंबन्धी विवेचन आहे. (ऐतरेयांतील १ व ५ आरण्यकें पहा). पुढल्या चार अध्यायात कौषितकी उपनिषद् आहे. (ऐ. अ. ३-६ पहा). सातव्या आणि आठव्या अध्यायांत संहिता, पद, क्रमादि विषय आले आहेत. (ऐतरेय ३रें आरण्यक पहा). १ शाकल, २ बाप्कल, ३ आश्वलायन, ४ शांखायन आणि ५ मांडकेय, अशा ऋग्वेदाच्या पांच शाखा आहेत, असें चरणव्यूहांत सांगितले आहे. शाकल संहितेत वालखिल्यांचा अन्तर्भाव करीत नाहीत. आश्वलायन व शांखायन संहितेंत ती अन्तर्भूत आहेत. बाप्कलसंहितेंत आठ ऋचा अधिक आहेत आणि पहिल्या मंडलांतील सूक्तांचा अनुक्रम भिन्न आहे. मांडुकेय संहिताग्रन्थ सध्या उपलब्धच नाही असे म्हणतात. ऋग्वेदाचे आठ भेद आहेत, असेंहि चरणव्यूहांत सांगितले आहे. त्यांची नांवें येणेंप्रमाणे:चर्चाश्रावक, चर्चक, श्रवणीयपार, क्रमपार, क्रमजट, क्रमवट, क्रमरथ, आणि क्रमदंड.