पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिन सवनाचे शस्त्राचे वर्णन करून मारुत्वती शस्त्र व पक्षीरूपी निष्कैवल्य शस्त्राच्या सर्व अंगाच्या अवयवांचें सविस्तर प्रतिपादन आहे. दुसऱ्या आरण्यकांत पहिल्या तीन अध्यायांत प्राण व पुरुष यांविषयी विचार आहे. उक्थ शस्त्रांत ध्येय जो प्राण त्याचे अनेक उपास्यगुण सांगून मण्डलाचे सर्व ऋषि व मंत्र यांच्यांशी प्राणांचा संबंध जोडून दिला आहे. ह्या आरण्यकांतील चवथ्या अध्यायापासून सातव्या अध्यायांपर्यंत ऐतरेय उपनिषद् आहे. कर्मकांड संपल्यापर उपनिषदास आरंभ चवथ्या अध्यायांत केला आहे. 'आत्मा वा इदमेक एकाग्र आसीन्नान्यं किंचन मिषत्" । येथून. आरंभ होऊन सातव्या अध्यायाचे शेवटी ' वक्तारमवतु वक्तारम् ' येथे उपनिषदाची समाप्ति झाली आहे. दुसऱ्या आरण्यकांत मध्यम विद्याधिकारी लोकांकरितां प्राणविद्या सांगितली आहे, आणि उत्तम विद्याधिकाऱ्यासाठी ब्रह्मविद्या ( उपनिषद् ) सांगितली आहे. तिसऱ्या आरण्यकांत अधम विद्याधिकाऱ्याकरितां संहिता, पद आणि क्रम यांचे कसें अध्ययन करावें हे रूपक करून सांगितले आहे. त्याचप्रमाणे मूळ अक्षरांतील स्वर, व्यंजनें आणि उष्म, ( श, ष, स आणि ह ) यांची माहिती आहे. चवथ्या आरण्यकांत अरण्यांत जाऊन अध्ययन करण्यास योग्य असे मंत्र सांगितले आहेत. या मंत्राचा विनियोग आश्वलायन सूत्रांत दिला आहे. पांचव्या आरण्यकांत महाव्रतासंबंधी २५