पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० प्रस्थानभेद. - - अध्यायांत ' अग्निहोत्र सांगितले आहे. राजाचा अभिषेक व त्याचा पुरोहित इत्यादिकांविषयी शेवटच्या ८ अध्यायांत वर्णन आहे. हा भाग पाठीमागन या ब्राह्मणास जोडला असावा. कारण कौषितकी ब्राह्मणांत याविषयींचे प्रतिपादन केलेले नाही. कौषितकी किंवा शांखायन हे ऋग्वेदाचें दुसरें ब्राह्मण होय. ऐतरेयांत आलेल्या विषयांचेच या ब्राह्मणांत प्रतिपादन केले आहे. तथापि हे प्रतिपादन अधिक विस्तृत आहे. अग्न्याधान ( अग्नीची स्थापना ) अग्निहोत्राचे सायंप्रात:म आणि दर्शपूर्णमासाच्या इष्टी या विषयांविषयी सविस्तर माहिती येथे दिली आहे. यांतहि सोमयागाचे ( अग्निष्टोमाचे ) वर्णन प्राधान्याने आलेले आहे. ग्रन्थाची रचना आधिक पद्धतशोर आहे. ऐतरेय ब्राह्मणाच्या ३३ व्या अध्यायांत हारश्चन्द्र राजा व शुनःशेप यांची आख्यायिका सांगितली आहे. ऐतरेय ब्राह्मणाचें ऐतरेय आरण्यककांड आहे. याचे पांच भाग केले आहेत. प्रत्येक भागास आरण्यक ह्मणतात. आरण्यकाचे अध्याय व खंड असे विभाग आहेत. एकंदर १८ अध्याय आहेत, आणि ७५ खंडे आहेत. पहिल्या आरण्यकांत इंद्राने वृत्राला ठार मारला त्यामुळे तो इन्द्र महान् झाला आणि त्याला आनंद व्हावा म्हणून सोम सवनादि अग्निष्टोम हे महाव्रत आरंभावे, असे सांगून त्याचे अनुष्ठान सांगितले आहे. प्रातःसवनाची प्राकृत व वैकृत अशी दोन आज्यशस्त्रं वर्णिली आहेत. पुढे माध्य