पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. घेद. मेलेल्या मनुष्यांस तो पितृलोकी नेतो. विष्णु हा देव ऋग्वेदांत इतका प्रसिद्ध नाही. सूर्य उगवतो, मध्यान्हीं तो आपल्या मस्तकावर येतो आणि संध्याकाळी तो अस्तास जातो. ही विष्णूची तीन पाऊले आहेत. ह्या तीन पावलांनी तो सर्व जगत् क्रमून जातो. तो सर्व धर्माचे पाळण करतो व लोकांना ते धर्म पाळण करण्यास लावतो. तो इन्द्राचा सखा आहे. उषा ही फार सुंदर स्त्री आहे. रात्रीची ती बहीण व सूर्याची बायको आहे. सुमारे वीस सूक्तांत सृष्टीतील ह्या सुंदर चमत्काराचे फार सुंदर रीतीने व काव्यरसपरिपूर्ण असें वर्णन आले आहे. अशाप्रकारचे अनेक देवतांचे ऋग्वेदांत वर्णन केलेले आहे. त्याविषयी अधिक हकीगत येथे देतां येत नाही. ___ ब्राह्मणांचें सामान्यस्वरूप पूर्वीच सांगितले आहे. ऋग्वेदांची दोन ब्राह्मणे आहेत -ऐतरेय ब्राह्मण आणि कौषितकी किंवा शांखायन ब्राह्मण. ऐतरेय ब्राह्मणांत आठ पंचिका आहेत. प्रत्येक पंचिकेत पांच पांच अध्याय असतात. या ब्राह्मणांत एकंदर ४० अध्याय आणि १६२ खंडें आहेत. पहिल्या सोळा अध्यायांत अग्निष्टोमाविषयीं हकीगत आहे. अग्निष्टोमाचे अनुष्ठान एका दिवसाचेच असते. सतरा व अठरा अध्यायांत ' गवायमन ' यज्ञाचे वर्णन आहे. हे अनुष्ठान ३६० दिवस चालू असते. १९-२४ अध्यायांत 'द्वादशाह ' यागासंबन्धी माहिती दिली आहे. २५-३२