पान:प्रस्थानभेद अथवा चौदा विषयांचे दिग्दर्शन.djvu/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्थानभेद वरुण या नावाने ते प्रसिद्ध आहेत. ' सूर्य ' हा मित्राचा आणि अग्नीचा डोळा आहे. तो अंधकार नाहींसा करतो. आणि सर्व जगांतील आचारावर त्याचे लक्ष असते. ते त्याला दिसतात. सात घोड्यांच्या रथांत तो बसून येतो. सूर्य उगवला म्हणजे लोक आपापली कामें करूं लागतात आणि — पापांपासून आमचे क्षालन कर ' अशी त्यास प्रार्थना करतात. रोग व दुष्ट स्वप्में तो घालवितो. त्याच्या योगानें कालगणना होते. उषा त्याला घेऊन येते. ती त्याची स्त्री आहे. ' सविता ' हा प्रचोदक आहे. लोकांच्या कर्तत्वशक्तीस तो प्रोत्साहन देऊन त्यांस आपापली कामें करण्यास लावतो. त्याची हिरण्मय मूर्ति आहे. त्याचे हात पाय व रथ सोन्याचे आहेत. पूर्वेकडून तो आपला प्रकाश चोहोंकडे पसरतो. राक्षस, रोग व दुष्टस्वप्ने यांचा नाश सविता करतो, देवांना अमृतत्व आणि मनुष्यास दीर्घ आयुष्य तो देतो. सर्व देव त्याचे एकतात. तो नायक आहे. सवितृदेवाची गायित्रीछन्दोबद्ध प्रार्थना सुप्रसिद्ध आहे. त्यांत आपले मन व बुद्धि शुद्ध व्हावी, अशा हेतूनें त्याचें ध्यान करावे असे सांगितले आहे. ' तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ' ह्या मंत्राचा प्रत्येक धार्मिक ब्राह्मण दररोज जप करीत असतो. ' पूषा ' हा नुकताच उगवलेला सूर्य होय. तो सर्वांचे पोषण करणारा आहे. विशेषतः गुराढोरांचे रक्षण करतो; त्यांस वाट दाखवितो, आणि अशारीतीनें तो लोकांचे कल्याण करतो.